लवकरच सुरू होणार ‘मुळशी पॅटर्न’च्या रिमेकचं शुटींग, मुख्य भूमिकेत दिसणार ‘भाईजान’ सलमान !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवूड स्टार सलमान खान (Salman Khan) लवकरच आपला जीजू आयुष शर्माला (Aayush Sharma) घेऊन एक सिनेमा करणार आहे. सलमान खान 2018 साली आलेल्या प्रविण तरडे (Pravin Tarde) डायरेक्टेड मुळशी पॅटर्न (Mulshi Pattern)या मराठी सिनेमाचा रिमेक करणार आहे. हा सिनेमा तेव्हाचा हिट सिनेमा आहे. लवकरच याचा रिमेक तयार केला जाणार आहे. खास बात अशी की, सलमान खान यात प्रमुख भूमिकेत आहे. गेल्या काही दिवसांपासून असं बोललं जात होतं की, या सिनेमाचं नाव गन्स ऑफ नॉर्थ आहे. मात्र आता या सिनेमाचं नाव अंतिम (Antim) असं निश्चित करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. राधेच्या शुटींगनंतर लवकरच सलमान आता या सिनेमाकडे वळणार असल्याचं बोललं जात आहे.

सलमान खान या सिनेमात पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे. स्टोरी आयुष शर्माच्या भोवती फिरणार आहे. आयुष शर्मा एका गँगस्टरचा रोल साकारणार आहे ज्याला सलमान खान पकडण्याचा प्रयत्न करणार आहे. मराठी सिनेमात तर हा दबंग पोलीस अधिकारी त्या गँगस्टरला मारहाण करताना दिसतो. परंतु हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे की, समलान खान आपल्या जीजूवर हात उचलतो की, नाही. महेश मांजरेकर या सिनेमाचं डायरेक्शन करणार असल्याचं बोललं जात आहे.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे इंडियाज मोस्ट वॉन्टेड या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळं ते शक्य झालं नाही.

You might also like