#BirthDay : राधिका आपटेचं बॉलिवूड करिअर NUDE सीनमुळे राहिलं होतं ‘वादात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री राधिका आपटे आज आपला 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. राधिका आपटे मराठी इंडस्ट्रीपासून तर बॉलिवूडपर्यंत फेमस आहे. परंतु यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला आहे. एक काळ असा होता की, घराचे भाडे देण्यासाठीही तिच्याजवळ पैसे नव्हते.

आपल्या स्ट्रगलच्या काळात राधिकाने बेस्टने प्रवास केला आहे. ती नेहमीच पैसे वाचवत असे. तिने कधीच वडिलांकडून पैसे घेतले नाही. तिनं नाटकात काम करणं सुरु केलं. यातून तिला 8 ते 10 हजार रुपये मिळत असत. तिची बॉलिवूडमध्ये ओळखही नव्हती. राधिका सांगते की, कामासाठी कोणाला फोन करावा ते कळत नव्हतं. ब्रेक मिळण्याआधी ती पुण्याला आली. नंतर केवळ नाटकात काम करायचं असं तिने ठरवलं.

राधिकाचा बॉयफ्रेंड बेनेडिक्ट टेलरनं तिला मुंबईत येण्यासाठी तयार केलं. 2012 मध्ये दोघांनी लग्न केलं. रधिका सांगते की, “मला एक चांगला सिनेमा मिळाला होता. परंतु मला त्यातून काढून टाकलं कारण माझं 4 किलो वजन वाढलं होतं. त्यावेळी मी मैत्रिणींसोबत बरिस्तामध्ये होते. केक मागवला होता. परंतु मी केक खाऊ शकले नाही.”

दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या एका सिनेमात 2015 मध्ये तिने न्यूड सीन दिला होता. हा सीन दुर्दैवानं लीक झाला. यामुळे राधिकावर खूप टीका झाली. अनुरगने पोलिसांत तक्रारही दिली होती. यानंतर तिने अनेक सिनेमात बोल्ड सीन दिले जे चर्चेत राहिले. परंतु या न्यूड सीनमुळे मात्र राधिकाचं करिअर त्यावेळी प्रचंड वादात राहिलं. काही दिवसांपूर्वी द वेडिंग गेस्ट सिनेमातील देव पटेल सोबतचा एक इंटिमेट सीनही लीक झाला होता. यावेळी तिने संताप व्यक्त केला होता.

 

You might also like