‘हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील फरक म्हणजे पैशांसाठी भीक मागावी लागत नाही’ : अभिनेत्री राधिका आपटे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्रींपैकी एक म्हणजे राधिका आपटे आहे. आपल्या अदाकारी आणि बोल्डनेस आणि बिंधास्त अंदाजासाठी राधिका ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपासून राधिका हॉलिवूडमधील द वेडिंग गेस्ट सिनेमामुळे चर्चेत होती. यानंतर आता ती ‘लिबरेट : ए कॉल टू स्पाई’ सिनेमामुळे चर्चेत आली आहे. या सिनेमात ती दुसऱ्या महायुद्धातील प्रसिद्ध गुप्तहेर नोरा बेकरची भूमिका साकारली आहे.

image.png

या सिनेमाबद्दल बोलताना राधिका म्हणाली की, “या भूमिकेसाठी मला प्रत्येक विषयावर काम करावं लागलं आहे. मी अनेक कादंबऱ्याही वाचल्या आहेत.” हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या फिल्म मेकिंगमध्ये काय फरक आहे या प्रश्नावर बोलताना राधिका म्हणाली की, “मला वाटतं की, सर्वांची काम करण्याची पद्धत वेगळी असते.”

image.png

राधिका म्हणाली की, “मी हॉलिवूड सिनेमात दोन गोष्टी नोटीस केल्या आहेत. तेथे लोक खूप वक्तशीर आहेत. तु्म्हाला वेळेत तुमचे पैसे मिळतात. पैशांसाठी भीक मागवी लागत नाही.”

image.png

राधिका द वेडिंग गेस्टमध्ये देव पटेलसोबतच्या सीन लीकमुळे खूप चर्चेत आली होती. राधिका याबाबत बोलताना म्हणाली होती की, “वेडिंग गेस्टमध्ये आणखी सुदंर सीन्स आहेत. परंतु हा सीन लीक करण्यात आला आहे. कारण लोकांची मानसिकताच खराब आहे. मी माझ्या शरीर आणि बोल्ड सीनसोबत कंफर्टेबल आहे.” असेही राधिकाने एका मुलाखतीत बोलताना सांगितले होते.

image.png

आरोग्यविषयक वृत्त –