अभिनेत्री राधिका आपटेच्या ‘या’ सिनेमाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार राधिक आपटे हिच्या सिनेमाला या वर्षी ऑनलाईन आयोजित केल्या जाणाऱ्या पाम स्प्रिंग इंटरनॅशनल शॉर्ट फेस्टमध्ये बेस्ट मिडनाईड शॉर्ट हा पुरस्कार मिळाला आहे. द स्लीपवॉकर्स असं या सिनेमाचं नाव आहे. डायरेक्टर म्हणून राधिकाचा हा पहिला सिनेमा आहे. सोशलवरून पोस्ट शेअर करत राधिकानं याबद्दल माहिती दिली आहे.

राधिकानं तिच्या इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात ती म्हणते, “धन्यवाद पीएस फिल्म फेस्ट. आम्ही पाम स्प्रिंग फेस्टमध्ये बेस्ट मिडनाईट शॉर्ट पुरस्कार प्राप्त झाल्यानं आनंदी आहोत. बेस्ट मिडनाईट अवॉर्ड जिंकलेल्या द स्लीपवॉकर्सचं अभिनंदन.”

द स्लीपवॉकर्स सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर शहाना गोस्वामी आणि गुलशन देवैया स्टार या लघुपटाची कथा राधिकानं लिहिली असून याचं डायरेक्शनही तिनंच केलं आहे. झोपेत चालण्याच्या सवयीशी संबंधित हा सिनेमा आहे.

राधिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं अलीकडेच एक सिनेमा डायरेक्ट केला आहे. तिनं द स्लीपवॉकर्स असं त्याचं नाव असून ही एक शॉर्ट फिल्म आहे. शुट द पियानो प्लेअर या सिनेमात ती लिडमध्ये दिसणार आहे. श्रीराम राघवन डायरेक्टेड हा सिनेमा 2020 मध्ये रिलीज होणार आहे. याशिवाय रात अकेली है या सिनेमातही ती काम करणार आहे. हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज होणार आहे.