Radhika Madan | प्रसिध्द अभिनेत्रीनं केला मोठा खुलासा; म्हणाली – ‘मला शूटिंगच्या पहिल्याच दिवशी गर्भनिरोधक गोळी…’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अभिनेत्री राधिका मदाननं (Radhika Madan) आपल्या अभिनयानं स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. अगदी कमी वयात तिनं (Radhika Madan) अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तिनं छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनामध्ये राज्य केलं. मात्र या प्रवासात राधिकाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. त्याबद्दल तिने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला.

 

राधिका मदान (Radhika Madan) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तिनं अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीमध्ये शूटिंगबद्दलचा एक किस्सा सांगितला. राधिका म्हणाली की, ‘माझा शूटिंगचा पहिला दिवस होता आणि मला शूटिंगसाठी पहिल्याच दिवशी गर्भनिरोधक गोळी (Contraceptive Pill) खरेदी कराव्या लागल्या होत्या. जेव्हा मला दिग्दर्शकानं गर्भनिरोधक गोळी खरेदी करण्यास सांगितलं. तेव्हा मला थोडं आश्चर्य वाटलं. परंतु तो माझा चित्रपटातील माझा एक शॉट होता.’

“त्यानंतर मी माझ्या आई-वडिलांना सरप्राईज देण्यासाठी घरी पोहोचले होते. त्यांना बघितल्यानंतर मला फार आनंद झाला. मात्र त्याचवेळी त्यांनी त्या गर्भनिरोधक गोळ्या पाहिल्या आणि त्यांनाही धक्का बसला. हा सर्व प्रकार माझ्या आईवडिलांसाठी फार धक्कादायक होता. त्यावेळी माझे वडिल त्या गोळ्यांकडे बघत होते. ते देखील काही बोलले नाही”, असं राधिका म्हणाली.

दरम्यान, या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी राधिकाला प्रचंड संघर्ष करावा लागला. ती म्हणाली, करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला खूप संघर्ष करावा लागला. सोबतच सिनेसृष्टीत तिचा ठसा उमटवण्यासाठी तिनं खूप मेहनत केली. तिला अनेक प्रकारांना सामोरे जावे लागले. परंतु तिनं काही हार मानली नाही. तसेच एका दिग्दर्शकाने तिला तू सुंदर नाही असं सांगत चित्रपटातून नकारही दिला. परंतु तरीसुद्धा राधिकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली. ‘मेरी आशिकी तुमसे ही (Meri Aashiqui Tumse Hi)’ या मालिकेमधून तिनं अभिनयाची सुरुवात केली. यावेळी राधिका अवघ्या 19 वर्षाची होती. तसेच ‘फटाका (Pataakha)’ या सिनेमामधून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.

 

Web Title :- Radhika Madan | radhika madan had to buy contraceptive pill for her first take in mard ko dard nahin hota

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा