अंबानींच्या छोट्या ‘सुनबाई’ बांद्रयातील क्लिनिकच्या बाहेर, फोटो सोशल मिडीयावर ‘व्हायरल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिझनेसमॅन मुकेश अंबानी यांचे मोठे चिरंजीव आकाश यांनी ९ मार्च रोजी श्लोका मेहता सोबत विवाह केला होता. या विवाह सोहळ्यासाठी बॉलिवूड मधील अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र तरीही या लग्नात फक्त एकाच अशी व्यक्ती होती जिच्यावर सगळ्यांच्या नजरा होत्या. आणि ती व्यक्ती मुकेश अंबानी यांचे छोटे चिरंजीव अनंत अंबानी याची गर्लफ्रेंड राधिका मर्चेंट ही होती. मीडियामध्ये राधिकाला मुकेश अंबानी यांची ‘छोटी सून’ असेही म्हटले जाते.

राधिकाला अंबानींच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये पाहण्यात आले आहे, मधल्या काही दिवसांमध्ये अनंत आणि राधिकाच्या साखरपुड्याच्याही बातम्या येत होत्या. मात्र अधिकृतरीत्या कोणीही याला दुजोरा दिलेला नाही.
Radhika

नुकतेच राधिकाला बांद्रा येथे एका क्लिनिक मधून बाहेर येताना पाहिलं गेलं, यामध्ये तिने पांढरा शर्ट आणि काळी पॅंट परिधान केलेली होती.

क्लिनिक बाहेर येताच राधिका फोन वरती बिझी झाली राधिकाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावरती चांगलेच व्हायरल होत आहेत. राधिकाने आपली स्वतःची एक फर्म सुद्धा सुरु केली आहे २४ वर्षीय राधिकाला स्विमिंग आणि वाचन करण्याची आवड आहे.

आरोग्यविषयक वृत्त