‘शिद्दत : जर्नी बियार्ड लव’मध्ये मुख्य भुमिकेत दिसणार ‘हे’ ४ कलाकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘हिंदी मीडियम’, ‘स्त्री’ आणि ‘लुका छुपी’ सारख्या चित्रपटाचे निर्माते दिनेश विजनने आपल्या नवीन चित्रपट ‘शिद्दत : जर्नी बियार्ड लव’ ची घोषणा केली आहे. चित्रपटात अभिनेता सनी कौशल, राधिका मदान, मोहित रैना आणि डायना दिसणार आहे.

चित्रपटात सनीसोबत राधिका आणि मोहितसोबत डायनाची केमिस्ट्री दिसणार आहे. चित्रपटाचे निर्देशन कुणाल देशमुख करणार आहे. या चित्रपटाची शुटिंग पंजाब, पेरिस आणि लंडनला होणार आहे. सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाची कथा श्रीधर राघवन आणि धीरज रत्तनने लिहली आहे.

दिनेशने सांगितले की, ‘माझे आत्ताच लग्न झाले आहे. त्यामुळे मी समजू शकतो. पण आमच्यावेळी जिथे प्रेमाला खुप हलके समजले जाते. तेच लोक प्रेमात खुप खोलात जातात. याची कल्पना करणे अवघड आहे.’

पुढे दिनेश म्हणाला की, ‘शिद्दत’ फक्त प्रेमाची कथा नसून दुरावा असलेली कथा आहे जी, प्रेमात ठरवून केला जातो. याचा लोक विचारही करु शकत नाही. जेव्हा काही गोष्टींसाठी पुर्ण मन लावून आपण विश्वास ठेवतो. त्याला मिळवण्यासाठी जो प्रयत्न करतो ती ‘शिद्दत’ आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like