गस्ती पथकावर नियंत्रणासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी यंत्रणा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – गस्ती पथकावर आता नियंत्रण ठेवण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सीची यंत्रणा लावण्यात येणार आहे. सांगली महापालिका क्षेत्रातील 250 ठिकाणी ही यंत्रणा लावण्यात येणार आहे. या यंत्रणेच्या सहाय्याने गस्ती पथकावर नियंत्रण केले जाणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अधीक्षक शर्मा म्हणाले, सांगलीत शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याची सारी यंत्रणा नियंत्रण कक्षाशी जोडली आहे. सीसीटीव्ही कमेऱ्याद्वारे सांगली, मिरज, कुपवाड शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यात येत आहे. शिवाय गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासही मदत होत आहे. सीसीटीव्ही कमेऱ्याद्वारे आतापर्यंत 25 ते 30 गुन्हेगारांना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून सुमारे 40 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच “इ-चलन’द्वारे दंड वसुलीत राज्यात सांगली जिल्हा आघाडीवर आहे. आता गस्ती पथकावर नियंत्रण ठेवण्यासाठी “आरएफआयडी’ (रेडिओ फ्रिक्वेन्सी टेक्‍नॉलॉजी) लावण्यात येणार आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील 250 ठिकाणी ही यंत्रणा लावण्यात येणार आहे. त्याद्वारे गस्ती पथकातील पोलिस कोठे आहेत, ते वेळेवर गस्तीवर जाता की नाही, याची तपासणी होणार आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही यंत्रणा असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणे शक्‍य होणार आहे. तसेच महापालिकेनेही सीसीटीव्ही केमेऱ्यासाठी पन्नास लाख रूपये निधी मंजूर केला आहे. त्यातून शहरातील मुख्य रस्त्यांसह संवेदनशील ठिकाणी कॅमेरा लावण्यात येणार आहेत.

शर्मा म्हणाले, आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस दलातर्फे प्रयत्न सुरू आहेत. गुन्हेगारीपासून तरूणाईला प्रवृत्त करण्यासाठी भरोसा केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यात पोलिसांसह मानोसोपचार तज्ज्ञ, वकिल, शिक्षकांचे पॅनेल असेल. त्यातून समुपदेशन केले जाणार आहे. तसेच महिला अत्याचाराबाबतही असणाऱ्या केंद्राचीही व्याप्ती वाढवली जाणार आहे. चोरी, घरफोडी रोखण्यासाठीही खास पथके तयार करण्यात आली आहेत. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या