ब्लड प्रेशर असो वा पोटाच्या समस्या आरोग्यासाठी गुणकारी आहे मुळा ! फायदे वाचून व्हाल अवाक्

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अनेकजण ज्याप्रमाणे जेवण करताना कांद्याचं सेवन करतात. तसंच काही लोक तोंडी लावण्यासाठी मुळा खातात. यामुळं तोंडाला चव येते. परंतु मुळा खाण्याचे आपल्या शरीरालाही अनेक फायदे होतात. याबद्दल खूप कमी लोकांना माहित आहे. ज्यांना पोटाची समस्या आणि ज्यांना ब्लड प्रेशरची समस्या आहे त्यांना तर याचा खूप फायदा मिळतो. मुळा खाल्ल्यानं शरीराला कोणते फायदे मिळतात याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

1) पौष्टीक घटक – शरीराला आवश्यक अनेक पोषक घटक मुळ्यात असतात. त्यामुळं याचं सेवन करणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. 100 ग्रॅम मुळ्यात 18 ग्रॅम कॅलरी, 0.1 ग्रॅम फॅट, 4.1 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 1.6 ग्रॅम डायट्री फायबर, 2.5 ग्रॅम शुगर आणि 0.6 ग्रॅम प्रोटीन आणि 36 टक्के व्हिटॅमिन सी, 2 टक्के कॅल्शियम, 2 टक्के आयर्न आणि 4 टक्के मॅग्नेशियम असतं.

2) शरीरातील घाण बाहेर पडते – किडनीचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मुळा खूपच फायदेशीर ठरतो. कारण शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी याचा खूप फायदा होतो. यात फायबरचं प्रमाण अधिक असतं जे पोटदुखीवर रामबाण उपाय मानलं जातं. मुळ्याचं सेवन केलं तर पचनक्रिया देखील चांगली राहते. ज्यांना पोटासंबंधित काही समस्या आहेत त्यानी मुळ्याचा रस, आल्याचा रस, आणि लिंबाचा रस एकत्र करून त्याचं सेवन करावं. यामुळं भूक वाढते.

3) पचनक्रिया – मुळ्याचं सेवन केलं तर पोटाचे अनेक आजार दूर होतात. म्हणून मुळा पोटासाठी खूप फायदेशीर मानला जातो. जर तुम्हाला पोट जड वाटत असेल तर मुळ्याच्या रसात मीठ घालून त्याचं सेवन करावं. यामुळं तुम्हाला फायदा मिळेल. जर ताज्या मुळ्याचं सेवन केलं तर पचनक्रिया देखील चांगली राहते.

4) लिव्हरसाठी फायदेशीर – मुळ्याच्या सेवाननं लिव्हरची क्रिया देखील चांगली राहते. जर लिव्हरचा काही त्रास असेल तर जेवताना नियमितपणे मुळ्याचं सेवन करायला हवं. जर एखाद्याला काविळ झाली असेल तर त्याला नियमित मुळा खाण्याचा सल्ला दिला जातो. रोज जर याचं सेवन केलं तर तुम्ही अनेक समस्यांपासून दूर राहता.

5) ब्लड प्रेशरसाठी फायदेशीर – अनेकांना माहित नसेल परंतु मुळ्यात अँटी हायपरटेंसिव्ह गुण असतात. याचा फायदा ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी होतो. यात पोटॅशियचं प्रमाणही जास्त असतं जे शरीरातील मेंसोडियम पोटॅशियचा स्तर बॅलन्स ठेवतं. यानं ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहतो.

…तर मुळा खाऊ नका

मुळ्याचे शरीराला अनेक फायदे होतात. परंतु जर एखाद्याला वाताची समस्या असेल तर मुळा खावू नका असा सल्ला दिला जातो. कारण यामुळं वात आणखी वाढतो असं सांगितलं जातं. म्हणून ज्यांना वाताची समस्या आहे त्यांनी मुळ्याचं सेवन करू नये.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.