सप्तपदी घेण्याआधी रायबरेलीची आमदार आदिती सिंगने वडिलांच्या आठवणीत लिहले भावनिक ‘Twit’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रायबरेली येथील कॉंग्रेसची आमदार अदितीसिंग आज पंजाबमधील नवांशहर येथील कॉंग्रेसचे आमदार अंगद सैनी यांच्याशी विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नाच्या तयारी दरम्यान तिने आपले वडील अखिलेश सिंग यांची आठवण काढून भावनिक ट्विट केले आहे. तिचे हे ट्विट सोशलवर व्हायरल होत आहे. अदिती सिंग हिने या ट्विटमध्ये म्हटले आहे की, तिला वडिलांची खूप आठवण येत आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अदिती सिंग हिने वडील अखिलेश सिंग यांच्या उपस्थितीत झालेला साखरपुड्याचे फोटो ट्विट करुन लिहिले होते की, ‘आपल्या मुलीचे लग्न करणे हे वडिलांचे सर्वात मोठे स्वप्न असते. पप्पा, तूम्ही अंगदला माझा आयुष्याचा सोबती म्हणून निवडले, पण आज तूम्ही या आनंदाच्या प्रसंगी नाही. तुमची खूप आठवण येत आहे.’

काही दिवसांपुर्वीच रायबरेलीचे अनेकवेळा आमदार झालेले अखिलेश सिंग यांचे निधन झाले. अखिलेश सिंग अनेक वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त होते. त्यांनी आदितीचे लग्न कॉंग्रेसचे आमदार अंगद सैनी यांच्याशी ठरविले होते. तिच्या इच्छेनुसार, अदिती आणि अंगद आज दिल्लीत लग्न करणार आहेत. अदितीने एका वृत्तसंस्थेला सांगितले होते की, तिच्या वडिलांनी तिला सांगितले होते की, काही झाले तरी लग्नाची तारीख बदलू नये. त्यांच्या इच्छेमुळे लग्नाची तारीख बदलली गेली नव्हती.
image.png
20 नोव्हेंबरला आदितीचा मेहंदी सोहळा पार पडला. बऱ्याच नामांकित सेलिब्रिटींनी मेहंदीला हजेरी लावली. आज होणाऱ्या लग्नात राजकारणी, बॉलिवूड आणि क्रिकेटपटूंचा सहभाग असण्याची अपेक्षा आहे.
image.png

Visit : Policenama.com