राहुल गांधींशी नाव जोडल्यानं झाली भलतीच ‘चर्चा’, आता आमदार महिला करणार ‘या’ MLA सोबत ‘लग्न’

रायबरेली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमधील रायबरेलीच्या काँग्रेस आमदार अदिती सिंह लवकरच लग्नबेडीत अडकणार असून पंजाबचे आमदार अंगद सैनी यांच्याशी त्यांचं लग्न ठरलं आहे.  21 नोव्हेंबरला नवी दिल्लीत हा लग्न समारंभ होणार असून 23 नोव्हेंबरला रिसेप्शन आयोजित करण्यात येणार आहे. अंगद आणि आदिती हे दोघेही 2017 मध्ये आमदार झाले होते.

अंगद सैनी पंजाबमधील शहीद भगत सिंह नगर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.  ते नवांशहर येथून 9 वेळा  प्रतिनिधीत्व करणाऱ्या दिलबाग सिंह यांच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. तर अदिती सिंह रायबरेली विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यांचे वडील अखिलेश कुमार सिंह  5 वेळा रायबरेलीचे आमदार राहिलेले आहेत.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींशी नाव जोडले गेल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. मात्र, या चर्चा केवळ अफवा असल्याचं स्पष्ट करत अदिती सिंह यांनी हे वृत्त फेटाळलं होतं.  राहुल गांधी यांच्यासोबत साखरपुडा झाल्याच्या अफवा असून आपण त्यांना राखी बांधत असल्याचं आदिती सिंग यांनी सांगितलं होतं.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like