‘राफेल’च्या चाकाखाली ‘लिंबू’ आणि वाहिले ‘नारळ’, संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांनी केली ‘फ्रान्स’मध्ये पूजा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूकीदरम्यान वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राफेल लढाऊ विमान आज अखेर फ्रान्सने भारताला सुपूर्द केले. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये दाखल होऊन पहिल्या वहिल्या राफेल लढाऊ विमानाची पूजा केली. आता हे लढाऊ विमान भारताच्या ताफ्यात दाखल झाले आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विमानावर ओम काढून, नारळ ठेवून पूजा केली. विशेष म्हणजे यावेळी भारतीय रितीरिवाजानुसार नव्या राफेलच्या चाकाखाली दोन लिंबू देखील ठेवण्यात आले होते.

राजनाथ सिंह यांनी फ्रान्सला पोहोचल्यावर आनंद व्यक्त करताना सांगितले की, राफेल भारतात येत आहे, येत्या 8 ऑक्टोबरला ते भारताला सुपूर्द केले जाईल. यासाठी सगळेच उत्साही आहे, जे स्वाभाविक आहे.

ही आहे राफेलची खासियत
राफेल लढाऊ विमानाची खासियत म्हणजे यात हे उत्तम क्षमता असलेले दोन इंजिन लावण्यात आले आहेत. राफेलची निर्मिती दसॉल्ट या फ्रान्स कंपनीकडून करण्यात आली आहे. यामध्ये स्काल्प, मिटिऑर ही दोन क्षेपणास्त्र आहेत, यामुळे भारताकडे हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता प्राप्त होईल.

भारताला मिळणाऱ्या राफेल विमानात मिळणार हे 6 बदल –

1. इस्रायली हेल्मेट माऊंटेड डिस्प्ले
2. 10 तासांची फ्लाईट डेटा रेकॉर्डिंग सिस्टम
3. ट्रॅकिंग सिस्टम
4. रडार वॉर्निंग रिसिव्हर्स
5. लो बॅण्ड जॅमर्स
6. इन्फ्रा-रेड सर्च

Visit : Policenama.com