‘राफेल विमानां’ना शत्रूराष्ट्रांकडून नाही तर ‘त्यांच्या’कडून धोका !

अंबाला : वृत्तसंस्था – भारतीय हवाई दलाला सध्या एक मोठी समस्या भेडसावत आहे. ती म्हणजे राफेल या लढाऊ विमानांच्या सुरक्षेची. अंबाला एअरवेजजवळ मोठ्या संख्यने असलेल्या कबुतरांचा धोका राफेल विमानांना असल्याने आता या कबुतरांचा बंदोबस्त करण्याची मागणी हवाई दलाने केली आहे.

विशेष म्हणजे अंबाला एअरवेजजवळ राहणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर कबुतरे पाळली आहेत आणि त्या कबुतरांच्या मुक्त संचारामुळे आकाशात उड्डाण करणाऱ्या विमानांना ती धडकत असल्याने मोठया दुर्घटनेची भीतीही हवाई दलाने व्यक्त केली आहे.

याबाबत वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अंबाला एअरवेजजवळ राहणाऱ्या नागरिकांच्या या कबुतरांमुळे आकाशात उड्डाण करणाऱ्या राफेल विमानांना कबुतरे धडकल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र नुकतेच कबुतरे धडकल्याने राफेल विमानाच्या पायलटने प्रसंगावधान दाखवत हवेतच विमानाच्या अतिरिक्त इंधनाच्या टाक्या जमिनीवर फेकल्या; पण त्यावेळी मोठा स्फोट झाला आणि आगीच्या ज्वाळा उसळल्या.

पायलटने दक्षता घेत आगीच्या ज्वाळातून विमानाला सुरक्षित बाहेर काढत तातडीचे ‘लँडिंग’ केल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यामुळे भविष्यात राफेल विमानांना दुर्घटनेपासून वाचविण्यासाठी हवाई दलाने एअरवेजजवळ राहणाऱ्या नागरिकांना कबुतरे पाळण्यास पूर्णपणे बंदी घालावी अशी मागणी केली आहे.

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा न्यायालयात आव्हान !

काँग्रेस पक्ष्याचे चिन्ह पण घ्या सर

वडार समाजाचे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ‘दगड फोडो’ आंदोलन

मोदी दोन मंदिरात गेले, तर केसीआर ६ मंदिरात जातील – ओवैसी