राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा केंद्राला १० दिवसांचा अल्टिमेटम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राफेल करारासंदर्भात सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला बुधवारी १० दिवसांची मुदत दिली आहे. केंद्र सरकारने १० दिवसांत राफेल करारातील धोरणात्मक प्रक्रिया आणि किंमतीसंदभार्तील तपशील लखोटाबंद पाकिटात सादर करावा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

राफेल करारा प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली असून या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने केंद्राला १० दिवसांमध्ये राफेल करारासंदभार्तील माहिती लखोटाबंद पाकिटात सादर सादर करण्याचे आदेश दिले.
याबाबत यापूर्वीही सुप्रीम कोर्टाने राफेल कराराशी संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते.

त्यावेळी कोर्टाने राफेल कराराविषयी कोणतेही मत व्यक्त केले नव्हते. आम्ही फक्त कायद्यानुसार या करारासाठी करावयाचा कार्यवाहीची पुर्तता करण्यात आली आहे की नाही़ याविषयी तपासणी करणार असून प्रक्रियेविषयीची आवश्यक बाबी पूर्ण केल्या होत्या का याची माहिती घेणार असल्याचे सांगितले होते. असे असतानाही केंद्र सरकारने ही माहिती अद्याप दिली नाही.
त्यामुळ आज झालेल्या सुनावणीत १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.