home page top 1

लिंबू, नारळ, ॐ, मीठ… ‘राफेलचं शस्त्र पूजन म्हणजे भाजपचं नाटक’ – काँग्रेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताला फ्रान्सकडून चर्चेत असलेले लढाऊ विमान राफेल सुपूर्द करण्यात आले आहे. राफेल भारताला मिळाल्यावर अनेक वादांचा धूराळा उडाला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये शस्त्र पूजन करताना राफेलवर नारळ चढवले, ॐ असे देखील लिहिले आणि राफेलच्या चाकांखाली लिंबू ठेवला. यावरुन काँग्रेस नेता संदिप दीक्षित यांनी सरकारवर चांगलाच निशाणा साधला.

राफेलच्या शस्त्र पूजेवर काँग्रेस नेत्याने केली टीका
काँग्रेस नेते संदिप दीक्षित यांनी राजनाथ सिंह यांनी केलेल्या शस्त्र पूजेवर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की संरक्षण मंत्री विमान आणण्यासाठी का गेले. हे काम वायू सेनेचे आहे. ते म्हणाले की आणि हे फक्त एकच लढावू राफेल विमान आपल्याला मिळाले आहे.

राफेल विमानाच्या चाकांखाली ठेवलेल्या लिंबूवर ते म्हणाले की विजयादशमी आणि राफेल विमानाची जोडी मॅच होत नाही. संदीप दीक्षित म्हणाले की दसऱ्याचा सण आहे, आपण सर्वजण तो साजरा करतो, परंतू एअरक्राफ्टचा त्याच्याशी संबंध जोडण्याची काय गरज होती, हे सरकारच असे आहे जे नाटक जास्त करते.

केवळ काँग्रेसच नाही तर राफेलच्या शस्त्र पूजेवरुन सोशल मिडियावर चांगलीच चर्चा पेटली आहे. सोशल मिडियावर लोकांनी लिहिले की असे पहिल्यांदाच होत आहे, जगाने असे काही पहिल्यांदाच पाहिले आहे. काही लोकांना लिहिले की भारताने शेवटी राफेलला देशी बनवले. याशिवाय राफेलच्या लिंबू, नारळवर अनेक मीम्स देखील व्हायरल होत आहे.

जेव्हा राजनाथ यांनी शस्त्र पूजा केली
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी फ्रान्समधून राफेल विमान रिसीव्ह केले. असे पहिल्यांदाच झाले की एखाद्या लढावू विमानाची भारतीय ताफ्यात असा प्रवेश झाला. जेव्हा संपूर्ण जग भारताच्या शस्त्र पूजेला पाहत होते.

राजनाथ सिंह यांनी शस्त्र पूजा करत राफेल विमानावर ॐ काढला, चाकांखाली लिंबू ठेवले. याशिवाय राफेलवर मीठ ठेवण्यात आले, नारळ फोडण्यात आला, शस्त्र पूजेदरम्यान अनेक विधी करण्यात आले.

Visit : Policenama.com 

 

Loading...
You might also like