काकू, राफेलची फाईल हरवली आहे, कुठे मिळते का बघा ? ठाण्यात पोस्टरबाजी

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची पोस्टरबाजी चांगलीच चर्चेत आली आहे. भाजप शिवसेना युतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मातोश्रीबाहेर केलेली पोस्टरबाजी मोठी चर्चेत आली होती. आता मुंबई आणि ठाणे परिसरात ‘काकू राफेलची फाईल हरवली आहे” या पोस्टरची चर्चा रंगली आहे. हे पोस्टर नक्की कोणी लावले आहे हे समजू शकले नाही मात्र सोशल नेट्वर्किंग साईट्सवर देखील हे पोस्टर चांगलेच व्हायरल होत आहे. ठाण्यातील नितीन कंपनी जवळील उड्डाण पुलावर तसेच रेल्वे स्टेशन परिसरात हे पोस्टर झळकत आहे.

काय आहे पोस्टर

या पोस्टरवर राफेल विमानांचे चित्र छापले आहे.

“काकू राफेलची फाईल हरवली आहे
कुठे मिळते का बघा ?
कपाटात शोधा ,गादीखाली शोधा
मिळाल्यास चौकीदाराशी संपर्क साधा ”

अशा आशयाचे हे ट्विट आहे. या पोस्टरची चर्चा सध्या शहरात रंगली आहे.

राफेलची फाईल चोरीला

सुप्रीम कोर्टात राफेलप्रकरणी झालेल्या सुनावणी वेळी अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी राफेल कराराची कागदपत्रे चोरी झाल्याचे सुप्रीम कोर्टाला सांगितले होते. एकीकडे पंतप्रधान मोदी हे चौकीदार असल्याचे सांगत आहेत. मात्र या चौकीदाराच्या ताब्यातूनच ही कागदपत्रे चोरीला गेल्यामुळे नागरिकांमध्ये सांताप व्यक्त केला जात आहे.

राफेल करार संदर्भाच्या कागदपत्रे गोपनीय होती, परंतु या कागदपत्रांच्या फोटोकॉपीज काढल्यामुळे ती सार्वजनिक झाली. असे सांगितल्यानंतर देखील विरोधी लोकांकडून सरकार वर टीका करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधकांसह देशभरातून सर्वांनी सरकारवर टीका करणे सुरु केले आहे. त्यामध्ये सामान्य नागरिकही सहभागी झाले आहेत.

ह्याहि बातम्या वाचा –

सैन्य भरतीला आलेल्या युवकाकडे सापडली २ ग्रेनेड

लोणावळ्यात बंगल्यात जुगार अड्डा ; पोलिसांचा छापा ३० जण ताब्यात

युतीने आठवड्याभरात जागावाटपाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा,अन्यथा… : घटक पक्षांचा इशारा

पूर्ण रमजानच्या महिन्यात मतदान थांबवणे शक्य नाही : निवडणूक आयोग

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊच शकत नाही ‘या’ नेत्याचे वक्तव्य

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us