धक्कादायक ! मेडिकल कॉलेजमध्ये ‘विवस्त्र’ करून विद्यार्थ्याचं ‘रॅगिंग’, त्यानं धाडस केलं म्हणून प्रकार उघडकीस

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव येथील इकरा युनानी महाविद्यालयामध्ये एका विद्यार्थ्याला विवस्त्र करून त्याच्यावर रॅगिंग करण्यात आल्याचा धक्कादाक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार शनिवारी मध्यरात्री घडला असून रॅगिंग झालेल्या मुलाने धाडस करून हा प्रकार उघडकीस आणला आहे. महाविद्यालयातील सिनियर विद्यार्थ्यांकडून 28 विद्यार्थ्यांची रॅगिंग झाली असून यामध्ये काही जणांना विवस्त्र करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

मुदस्सर मुख्तार इनामदार (वय-19 रा. परभणी) या विद्यार्थ्याने महाविद्यालयात सिनियर विद्यार्थ्यांकडून झालेल्या रॅगिंगच्या प्रकाराला वाचा फोडली आहे. दिल्ली येथील अँटी रॅगिंग समितीकडे या घटनेची तक्रार झाल्यानंतर तीन विद्यार्थ्यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुदस्सर हा परभणीचा राहणारा असून त्याचे वडील होमगार्ड समादेश म्हणून कार्यरत आहेत.

मुदस्सरला शासकीय कोट्यातून शहरातील पाचोरा रस्त्यावरील इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. प्रवेश मिळाल्यानंतर शुक्रवारी त्याला पालकांनी वसतीगृहात दाखल केले. यानंतर शनिवारी त्याच्या बॅचचा पहिला दिवस होता. रात्री सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या वसतिगृहात आपापल्या खोल्यांमध्ये झोपले होते. त्यावेळी 15 ते 20 सिनीयर विद्यार्थ्यांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास नव्याने महाविद्यालयात आलेल्या 28 मुलांना हॉलमध्ये नेऊन दरवाजा बंद केला.

सिनियर्सनी विवस्त्र केले
मुदस्सरने दिलेल्या माहितीनुसार, सिनियर्स विद्यार्थ्यांनी 28 मुलांपैकी काहींना विवस्त्र केले. त्यानंतर सिनेमातील पात्र, प्रियकर प्रेयसी यांच्या प्रमाणे अ‍ॅक्टिंग करण्यास सांगितले. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याची ओळखपरेड घेतली. त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी मुदस्सरला शिवीगाळ केली. त्याला विरोध केला असता चार ते पाच जणांनी मिळून त्याला खाली पाडून बेदम मारहाण केली. तसेच मोबाईल कचरा पेटीत टाकून देत खिशातील 18 हजार रुपये काढून घेतले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्याला फुंकर मारून ट्युब लाईट विझवण्यास सांगितले. तसेच ट्युबलाईट नाही विझली तर अंगावर फोडण्याची धमकी दिली. त्यांच्या त्रास असाह्य झाल्यानंतर त्याने तेथून पळ काढत आपली सुटका करून घेतली.

महाविद्यालय प्रशासनाला घडलेला प्रकार मान्य
मुदस्सरने हॉलमधून सुटाक करू घेत सुरक्षारक्षकाच्या फोनवरून वडिलांशी संपर्क साधला. त्याने त्याच्या आणि इतर विद्यार्थ्यांबाबत घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. वडिलांनी तात्काळ महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य़ डॉ. शोएब शेख यांनी महाविद्यालयात येऊन घटनेची चौकशी केली. रविवारी मुदस्सरचे पालक महाविद्यालयात आल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने रॅगिंग झाल्याचे मान्य करत तीन विद्यार्थ्यांची तडकाफडकी हकालपट्टी केली. काही विद्यार्थ्यांनी मुदस्सरची रोख रक्कम आणि मोबाईल लांबवला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like