भाई म्हणुन नमस्कार करायचा…. पुण्यातील सिंहगड इंजिनिअरींग कॉलेजमध्ये रॅगिंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – होस्टेलमध्ये झालेल्या मारहाणीबाबत रेक्टर व प्राचार्य यांना कळविण्याचा सल्‍ला देणार्‍या विद्यार्थ्याची रॅगिंग करत 8 विद्यार्थ्यांनी त्याला यापुढे भाई म्हणून नमस्कार करायचा अशी धमकी देत बेदम मारहाण केल्याची धक्‍कादायक घटना शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास येवलेवाडी येथील सिंहगड कॉलेजच्या इंजिनिअरींग होस्टेलमध्ये घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात 8 विद्यार्थ्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3cb5f82f-d1e3-11e8-8dec-c3885305e045′]
सुदर्शन बळीराम पानसरे, आयुष अजय भधाणे, अभिजित राजपूत, रमण व्ही. जिरमिरे, प्रथमेश सांळुखे, मणिष दाखोडे, पियुष एम. डोंगरे, प्रतिक घेंबाड (सर्व रा. सिंहगड अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनिअरींग कॉलेज होस्टेल) यांच्याविरूध्द भादंवि 452, 341, 323, 504, 506,143, 147, 140, सह महा.पो.का. 1951 चे कलम 37 (1) सह 135, महा. प्रोव्हि. ऑफ रॅगिंग अ‍ॅक्ट 1999 चे सह कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 19 वर्षीय विद्यार्थ्याने फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि.13) रात्री दीड वाजता फिर्यादी विद्यार्थी हा हॉस्टेलच्या रूम नं. 319 मध्ये झोपला होता. त्यावेळी आरोपी विद्यार्थी हे फिर्यादीच्या रूममध्ये जबरदस्तीने घुसले. त्यांनी फिर्यादीला तु तुझ्या मित्राला रेक्टर व प्राचार्य यांच्याकडे जाण्याचा सल्‍ला का दिला अशी विचारणा केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून त्यास छातीवर, पोटावर आणि इतर ठिकाणी बेदम मारहाण केली. तु पुण्यामध्ये कसा राहतो, तुला संपवुन टाकतो, तुला येथून सोडत नाही अशी धमकी दिली. आरोपींनी फिर्यादीला रूम बाहेर जावु दिले नाही.
[amazon_link asins=’B07D9G1GHB,B07D11MDBS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1cafebc7-d1e4-11e8-9cb1-6d130f017d81′]
आरोपीपैकी अभिजित राजपूतने फिर्यादीच्या डोक्यात आरसा फोडला तर सुदर्शन पानसरेने डोळयावर मारहाण केली. सर्व आरोपींनी आपआपसात संगणमत करून फिर्यादीस यापुढे भाई म्हणुन नमस्कार करायचा अशी पुन्हा धमकी दिली. आरोपींनी जबरदस्त रॅगिंग केल्यानंतर फिर्यादी विद्यार्थ्याने कॉलेजमधील वरिष्ठांना आणि पोलिसांना सांगितले. त्यानंतर कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक सी.एम. मोरे, पोलिस उपनिरीक्षक व्ही.व्ही. वाडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस.एस. काळे करीत आहेत.
[amazon_link asins=’B01HQ4O058,B017WDVV3M’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’83ff066b-d1e3-11e8-916e-2d8d2a3dac31′]