राष्ट्रवादीच्या ‘या’ दिग्गज नेत्याला जबरदस्त ‘धक्का’, समर्थकाचा शिवसेनेत प्रवेश

रायगड : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेत्यांनी आणि आमदारांनी पक्षाला रामराम केलेला असताना आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला आहे. रायगड जिल्ह्यातील पक्षाचे सरचिटणीस आणि खासदार सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक रघुवीर देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे सुनील तटकरे यांना हा मोठा धक्का समजला जात आहे.

रघुवीर देशमुख यांनी महाडचे शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी सहपरिवार शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता सुनील तटकरेंसाठी आगामी विधानसभा निवडणूक जड जाणार असून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मोठे कष्ट करावे लागणार आहेत. रघुवीर देशमुख यांच्यासह त्यांच्या परिवारातील पत्नी माधवी देशमुख, राज देशमुख, रोहन देशमुख यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी आमदार भरत गोगावले यांनी बोलताना म्हटले कि, देशमुख यांच्या पक्षप्रवेशाचा शिवसेनेला मोठा फायदा होणार असून त्यांच्यामुळे संपूर्ण कोकणात शिवसेनेला त्यांच्या अनुभवाचा फायदा मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांना संघटनेत योग्य असा सन्मान दिला जाईल, असेही त्यांनी म्हटले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांच्या विजयात देशमुख यांनी मोलाची भूमिका बजावली होती.

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, संदीप नाईक, मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड, आणि काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता पुन्हा या पक्षबदलाने राष्ट्रवादीला मोठा झटका बसला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like