‘बोल्डनेस’च्या सगळया मर्यादा तुटल्या, ‘रिलीज’ झालं रागिनी MMS रिटर्नचं ट्रेलर (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रागिनी पुन्हा एकदा सगळ्यांना घाबरवण्यासाठी तयार आहे. दीर्घ प्रतिक्षेनंतर मेकर्सनं रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 चा ट्रेलर लाँच केला आहे. रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 च्या ट्रेलरमध्ये सस्पेंस, अ‍ॅक्शन, थ्रिल, बोल्डनेस आणि हॉरर असा सर्वच तडका आहे. रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 चा ट्रेलर लोकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे.

कधी लाँच होणार सीरीज ?
रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज होणार आहे. सनी लिओनी दिव्या अग्रवाल आणि वरूण सूद यांच्या रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 चा ट्रेलर धमाकेदार आणि बोल्ड आहे. या वेब सीरीजमध्ये सनी एका गाण्यावर डान्स करतानाही दिसणार आहे. हैलो जी असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणंही नुकतंच रिलीज करण्यात आलं होतं ज्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. यात सनीचा खूपच बोल्ड अंदाज पहायला मिळाला होता.

काय आहे ट्रेलरमध्ये ?
ट्रेलरमध्ये दिसत आहे की, रागिनी आपल्या बॅचलर पार्टीसाठी गर्ल गँग्ससोबत ट्रीपला जाते. इथे मुलांची एक गँग आधीच हजर असल्याचं दिसतं. सर्वजण एकाच हॉटेलमध्ये असतात. हॉटेलमधूनच सर्व स्टोरी सुरू होती. वरूण सूद वेब सीरीजमध्ये हॉटेल्या मालकाच्या भूमिकेत आहे. खूप ट्विस्ट अँड टर्न्स असणारी अशी ही वेब सीरीज आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

You might also like