भाजपमधील OBC नेत्यांवरील ‘अन्याया’बाबत राजू शेट्टी म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – राज्यातील भाजपमध्ये ओबीसीविरूद्ध अन्य असे दोन गट पडल्याची चर्चा सध्या सुरू आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा जाहीररित्या वाचल्याने या चर्चेला पुष्टी मिळत आहे. भाजपमधील या वादावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाष्य केले आहे.

खासदार शेट्टी म्हणाले, नरेंद्र मोदी आणि अमित शहा सोडले तर भाजपमध्ये ओबीसीसह सर्वच समाज घटकांवर अन्याय होत आहे. राज्यात आज शेतकऱ्यांचे प्रश्न दुर्लक्षित आहेत. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, दुष्काळ, सिंचन यासारखे असंख्य प्रश्न आहेत. पण, त्याकडे कुणी पहात नाही. शेतकरी किड्या-मुंग्यासारखा मरत आहे. हे प्रथम थांबवले पाहिजे.

स्वातंत्र्यवीर सावरकारांच्या वादाबाबत खासदार शेट्टी म्हणाले, शेतकरी प्रश्नापुढे सावरकर यांच्यावरील वाद निरर्थक आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. १ रुपये १६ पैसे दराने शेतीसाठी वीज द्या.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like