राहु दोषातून मुक्त होण्यासाठी करा ‘हे’ 4 उपाय, दूर होतील सर्व अडचणी, जाणून घ्या 5 प्रभाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्योतिष शास्त्रात राहुला पाप ग्रह मानले जाते, जो जीवनात अडचणी निर्माण करतो. कुंडलीनुसार राहु जातकांना शुभ आणि अशुभ दोन्ही परिणाम देतो. कुंडलीमध्ये राहु आणि केतुमुळे कालसर्प दोष तयार होतो.

कुंडलीत राहु दोषाचा प्रभाव –
1 कुंडलीत राहु दोष असेल तर मानसिक तणाव वाढतो.
2 आर्थिक नुकसान होते.
3 ताळमेळ कमी होतो.
4 ग्रहांचा अशुभ प्रभाव पडू लागतो.
5 राहुचा शुभ प्रभाव व्यक्तीला रंकापासून राजा बनवतो, तर अशुभ फळ मिळाल्याने व्यक्ती राजापासून रंक होऊ शकतो.

कुंडलीत राहु कमजोर झाल्यास त्याच्या शांतीचे उपाय करावेत. यामुळे त्रास कमी होतो आणि अडचणी दूर होऊ लागतात.

राहु दोषाच्या शांतीचे उपाय
1 राहु ग्रहाच्या अशुभ परिणामांपासून वाचण्यासाठी राहु मंत्राचा जप करा.
2 राहुच्या अशुभ दशेपासून वाचण्यासाठी बुधवारी जव/बार्ली, मोहरी, नाणे, सात प्रकारची धान्य, निळ्या किंवा तपकिरी रंगाचे कापड आणि काचेची वस्तू दान करावी.
3 गोमेद रत्न धारण केल्यास राहु दोषापासून मुक्ती मिळते.
4 राहुमुळे होणारे आजार आणि अडचणींपासून वाचण्यासाठी राहु यंत्राची पूजा करा.