‘राहु-केतु’चे महापरिवर्तन म्हणजे काय ? ‘या’ 7 उपायांनी दूर करा याचे दुष्परिणाम

पोलीसनामा ऑनलाइन – आकाशात ग्रहांचे मार्गक्रमण लागोपाठ नवनवीन स्थिती बनवते. कधी ती खुप शुभ असते आणि कधी गंभीर रूप घेते. राहु- केतु अजूनपर्यंत मिथुन आणि धनु राशीत आहेत आणि 23 सप्टेंबरला राशी परिवर्तन करत आहेत. राहु वृषभ राशीत आणि केतु वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. राहुचे राशी परिवर्तन जीवनाच्या प्रत्येक भागावर परिणाम करते.

राहु-केतुच्या राशी परिवर्तनाचा परिणाम
राहु आणि केतु एकमेकांच्या समसप्तक राहतात आणि एकाच वेळी राशी परिवर्तन करतात. राहु वृषभ राशीत आणि केतु वृश्चिक राशीत 18 महिने राहतील. यांचा परिणाम विविध राशींच्या जातकांवर पुढील 18 महिन्यांपर्यंत कायम राहणार आहे.

राहु किंवा शनी जेव्हा वृषभ राशीला प्रभावित करतात, तेव्हा भारतात मोठे राजकीय आणि सामाजिक बदल होतात. काही गोष्टी लक्षात घेऊन या राशी परिवर्तनाच्या दुष्परिणामांना मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकते.

राहु-केतुची समस्या अशी करा दूर

1 राहु-केतु सर्वात जास्त मन प्रभावित करतात, अशावेळी सर्वप्रथम आपली दिनचर्या बदला आणि पवित्र बनवा.

2 रोज सकाळी तुळशीची पाने जरूर ग्रहण करा.

3 चंदनाचा टिळा आणि सुगंधाचा वापर करा.

4 मांस – दारू आणि फास्ट फूड खाणे बंद करा.

5 शक्य असेल तर नियमित मंत्रजप करा.

6 आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करून सकारात्मक ऊर्जेला आकर्षित करा.

7 आपले राहणीमान, आचार, विचार शुद्ध आणि पवित्र ठेवा.