2020 मध्ये कोणावर असणार शनि – राहूची ‘कृपा’दृष्टी ? ना – पैशांची ‘अडचण’, ना – घरात ‘भांडण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  वर्ष २०२० ची संख्या ४ आहे, ही संख्या राहूची संख्या आहे. त्यामुळे हे संपूर्ण वर्ष राहूवर प्रभाव पाडेल. वर्षाची सुरुवात कन्या लग्नात होईल, म्हणून वर्षाचे परिणाम हे मिळतेजुळते असणार आहेत. वर्षाच्या सुरूवातीस चंद्र कुंभ राशीत असेल आणि शनीचा देखील मजबूत प्रभाव असेल.

२०२० मध्ये, शनि आणि राहू ज्यांच्या राशीत असणार आहे त्या लोकांचा मोठा फायदा होईल. त्यांच्यासाठी हे वर्ष आकस्मिकताने परिपूर्ण असणार आहे. सन २०२० मध्ये देशात आणि जगात मोठी उलथापालथ होणार असून पुढच्या वर्षी कोणत्या लोकांना अधिक फायदा होण्याची शक्यता आहे ते जाणून घेऊया.

ज्या लोकांची जन्म तारीख ०४, १३, २२ किंवा ३१ आहे. ज्यांचे १३ व्या, २२ व्या, ३१ व्या किंवा ४० व्या वर्षाचे आयुष्य चालू आहे, त्या लोकांना केवळ २०२० मध्ये मोठ्या प्रमाणात फायदाच फायदा होईल.

ज्यांचा जन्म जानेवारी, फेब्रुवारी, एप्रिल, जून आणि जुलै मध्ये झाला आहे. आणि ज्यांची राशी कर्क, मकर अथवा कुंभ आहे त्यांनाही पुढील वर्षी लाभ होणार आहे.

ज्यांचा राहू किंवा शनि आपल्या कुंडलीत बळकट आहे त्यांनाही त्याचा फायदा २०२० मध्ये दिसू शकेल.

वर्ष २०२० मध्ये कोणत्या लोकांना समस्या होऊ शकतात :

ज्यांची जन्मतारीख ०८, १७ अथवा २६ आहे आणि ज्यांची राशी मिथुन, तूळ किंवा मीन आहे अशांना २०२० मध्ये काही समस्यांना सामोरे जावे लागेल. तसेच ज्यांच्या कुंडलीत राहु वाईट अवस्थेत आहे आणि जे लोक अनावश्यक वाद विवाद करतात त्यांच्यासाठी देखील पुढील वर्ष त्यांच्यासाठी फारसे चांगले नाही.

आगामी वर्ष चांगले बनवण्याचे कोणते मार्ग आहेत?

मधल्या बोटावर स्टीलची अंगठी घाला. नियमितपणे शंकराची पूजा करावी. तसेच वर्षभर कुत्र्यांना भाकरी, ब्रेड किंवा बिस्किटे खायला द्या. महिन्यातून एकदा भगवान भैरवला जरूर भेट द्या. या वर्षाचा फायदा घेण्यासाठी वर्षभर निळा रंग वापरा आणि कमीतकमी तपकिरी रंग वापरा.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/