ना मागणी, ना गुंतवणूक ‘विकास’ काय स्वर्गातून पडेल ? : राहुल बजाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अव्वल वाहन कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज ऑटोचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर त्यांनी ऑटो उद्योगाच्या ढासळत्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. बजाज ऑटोच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना संबोधित करतांना राहुल बजाज म्हणाले की, वाहन क्षेत्र अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. कार, व्यावसायिक वाहने आणि दुचाकी वाहनांची परिस्थिती ठीक नाही. कोणतीही मागणी नाही आणि खासगी गुंतवणूकही नाही, मग विकास कोठून येईल ? विकास स्वर्गातून कोसळेल काय ?

विकासात घट

देशातील बड्या उद्योगपतींपैकी एक म्हणून ओळखले जाणारे राहुल बजाज म्हणाले, “सरकारने सांगितले किंवा नाही सांगितले पण आयएमएफ आणि जागतिक बँकेच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की गेल्या तीन-चार वर्षांत विकासामध्ये घट झाली आहे. इतर सरकारांप्रमाणेच त्यांनाही हसणारा चेहरा दाखवायचा आहे, परंतु सत्य हेच आहे.”

राजीव बजाजही नाखूष

या अगोदर राहुल बजाज यांचा मुलगा आणि कंपनीचे एमडी राजीव बजाज यांनीही इलेक्ट्रिक वाहनांबाबत मोदी सरकारच्या योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राजीव बजाज यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, या सरकारला एका रात्रीत सर्व काही बदलायचे आहे. त्याचवेळी राजीव बजाज यांनी सरकारला विचारले की जर ग्राहकाने उद्या इलेक्ट्रिक व्हेईकल मॉडेल स्वीकारले नाहीत तर वाहन उद्योगाचे काय होईल ? आपण दुकान बंद करुन घरी बसावे का ?

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like