‘चेतक’ला मार्केटमध्ये ‘सुसाट’ चालवणारे ‘राहुल’ आता नाही संभाळणार ‘बजाज’मध्ये ‘कार्यकारी’ भुमिका, 1 एप्रिलपासुन बनणार ‘अकार्यकारी’ चेअरमन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील सुप्रसिद्ध व्यापारी आणि बजाज ग्रुपचे अध्यक्ष राहुल बजाज यांच्या भूमिकेत बऱ्याच काळापासून महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. राहुल बजाज यापुढे कंपनीच्या निर्णयांमध्ये थेट हस्तक्षेप करणार नाहीत. आता ते कंपनी बोर्डाचे नॉन-एक्झिक्युटिव्ह अध्यक्ष म्हणून काम पाहतील. दरम्यान, 1972 मध्ये बजाज ऑटोने आपली चेतक स्कूटर देशात लाँच केली. या स्कूटरने बाजारात येताच हवा निर्माण केली आणि देशातील तरुणांची पहिली पसंती बनली. आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यावेळी या स्कूटरचा वेटिंग पिरियड 4 ते 5 वर्षांचा होता. त्याचबरोबर कंपनीने गेल्या आठवड्यात चेतकला इलेक्ट्रिक व्हर्जनसह पुन्हा लाँच केले आहे.

राहुल बजाज 1 एप्रिल 1970 पासून कंपनीचे संचालक आहेत. 1 एप्रिल 2015 रोजी, कंपनीच्या मंडळावर 5 वर्षांसाठी संचालक म्हणून त्यांची पुन्हा नेमणूक झाली होती. 31 मार्च 2020 रोजी त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. 1 एप्रिल 2020 पासून, राहुल बजाज कंपनीमध्ये बजाज ऑटोच्या नॉन-एक्झिक्युटिव्ह अध्यक्षाच्या भूमिकेत असतील.

कोण आहेत राहुल बजाज –
राहुल बजाज यांचा जन्म बंगाल प्रेसीडेंसी (स्वातंत्र्यपूर्व पश्चिम बंगाल) मधील मारवाडी कुटुंबात 10 जून 1938 रोजी झाला होता. राहुल बजाज हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसेवक जमनालाल बजाज यांचे नातू आहेत. व्यावसायिक कुटुंबातील असल्याने राहुल बजाज यांनाही व्यवसायात रस होता. दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून इकॉनॉमिक ऑनर्स केल्यानंतर राहुल बजाज यांनी बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीत तीन वर्षे प्रशिक्षण घेतले. यावेळी त्यांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून पदव्युत्तर पदवीही घेतली आहे. राहुल बजाज यांनी 60 च्या दशकात अमेरिकेतील हार्वर्ड बिझिनेस स्कूलमधून एमबीएची डिग्री प्राप्त केली.

वयाच्या 30 व्या वर्षी 1968 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यावर राहुल बजाज यांनी ‘बजाज ऑटो लिमिटेड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा असे म्हणतात की हे पद मिळविणारे ते सर्वात तरुण भारतीय होते. ही कंपनी राहुल बजाज यांच्या हाती आली तेव्हा देशात ‘लायसन्स राज’ होते. त्यानुसार सरकारच्या परवानगीशिवाय उद्योगपती काहीही करू शकत नव्हते. व्यापाऱ्यांसाठी ही एक कठीण परिस्थिती होती. उत्पादन मर्यादा निश्चित केल्या होत्या. उद्योगपतींनाही मागणीनुसार पुरवठा करता आला नाही. त्या काळी अशी कथा प्रचलित होती की, कुणी स्कूटर बुक केली तर डिलिव्हरी बर्‍याच वर्षांनंतर दिली जात असे.

ज्या परिस्थितीत इतर उत्पादकांना काम करणे अवघड होते अशाही परिस्थितीत बजाजने मोठे उत्पादन घेतले आणि स्वत: ला देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक बनविण्यात यश मिळविले. सन 1965 मध्ये 30 दशलक्षच्या उलाढालीवरून बजाजने 2008 मध्ये सुमारे दहा हजार कोटींची उलाढाल गाठली होती.