दोन जिवलग मित्रांनी बनवलं IndiGoला ‘नंबर वन’, १५ वर्षानंतर ‘या’ मुद्दावरून सुरू झालं ‘वॉर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशातील एविएशन सेक्टरच्या अडचणी दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. जेट एअरवेज बंद झाल्यानंतर एअरलाईन इंडिगोमध्ये मतभेद खोल होताना दिसत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीचे प्रमोटर राहुल भाटिया आणि राकेश गंगवाल एकमेकांवर गंभीर आरोप लावत आहेत. दोघांमधील मतभेद इतके वाढले आहेत की, त्यांनी मार्केट रेगुलेटरची मदत घेतली आहे. यानंतर शेअर्समध्ये खूप घरसण झाल्याचे निदर्शनास आले. बुधवारी NSE वर इंडिगोचे शेअर १९८.२४ टक्के म्हणजेच ३०१.४५ रुपयांनी घसरून १२६४.८५ रुपयांवर आले.

या दोन मित्रांची कंपनीत मोठी हिस्सेदारी
राकेश गंगवाल एक अमेरिकन नागरिक आहे. ते इंडिगो मध्ये नॉन एक्जिक्युटीव डायरेक्टरच्या पदावर आहेत. त्यांना एविएशन इंडस्ट्रीचा ३० वर्षांचा अनुभव आहे. इंडिगोमध्ये गंगवाल यांची ३६.६८ टक्के हिस्सेदारी आहे. या प्रकरणी गंगवाल यानी मार्केट रेगुलेटर सेबीची मदत घेतली आहे. गंगवाल यांनी सेबीकडे एक्स्ट्राऑर्डिनरी जरनल मिटींग(EGM) घेण्याची अनुमती मागितली आहे. त्यांचा असा आरोप आहे की, कंपनी विवादीत रिलेटेड पार्टी ट्रॅंजॅक्शन मध्ये सहभागी आहे. कंपनीत भाटिया यांचे ३७.९ टक्के हिस्सेदारी आहे. त्यांनीही बोर्डला लिहिले आहे की, “गंगवाल यांचा RG ग्रुप फक्त कंपनीची प्रतिष्ठा खराब करत आहेत.”
Rahul Bhatya

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांमध्ये एअरलाईंस स्ट्रॅटेजी आणि महत्त्वाकांक्षेला घेऊन मतभेद झाले आहेत. अमेरिकेचे राकेश गंगवाल आता खेताना अँड कंपनीसोबत मिळून आपल्या पार्टनरसोबतचे मतभेद सोडवण्याचे प्रयत्न करत आहेत. तर राहुल भाटिया देखील JSA लॉ सोबत हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

gangwal

दोन मित्रांमध्ये दरार
२००३-०४ मध्ये राकेश गंगवाल आणि राहुल भाटिया यांनी मिळून इंडिगो एअरलाईन लाँच केली होती. सुरुवातीचे २-३ वर्ष चांगले गेले. परंतु नंतर मात्र कमी दरातील या हवाई सेवेने मोठा विस्तार केला. देशात मार्केट शेअरच्या बाबतीत ही नंबर वन एअरलाईन बनली. तज्ज्ञ म्हणतात की दोन मित्रांमधील ज्यादा एक्जिक्युटीव कंट्रोलला घेऊन ओढाताण सुरु आहे. म्हणूनच ही केस आता लॉ फर्मकडे आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

सावधान ! तांब्याच्या भांड्यात ठेवलेले ‘हे’ पदार्थ बनतात विषारी

माश्या, चिलटांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘ही’ फळे दुधासोबत खाणे आरोग्याला नुकसानकारक

चुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय