14 वर्षांनी लहान मुग्धा गोडसेला डेट करतोय अभिनेता राहुल देव, अभिनेत्यानं पहिल्यांदाच केलं ‘एज गॅप’वर भाष्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – बॉलिवूडमधील काही कपल असे आहेत जे आपल्या एज गॅपमुळं अनेकदा चर्चेत आले आहेत. मिलिंद सोमन-अंकिता कुंवर, अर्जुन कपूर-मलायका अरोरा, शाहिद कपूर आणि मीरा राजपूत तसेच आमिर खान-किरण राव असे काही कपल सांगता येतील. या यादीत आणि आणखी एक नाव समाविष्ट झालं आहे. बॉलिवूडमधील बॅड बॉय, अ‍ॅक्टर आणि मॉडेल राहुल देव गेल्या काही दिवसांपासून मॉडेल आणि अ‍ॅक्ट्रेस मुग्धा गोडसेला डेट करत आहे. 2015 पासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांमध्ये 14 वर्षांचा गॅप आहे. सोशल मीडियावर ते नेहमीच पोस्ट शेअर करत असतात. अलीकडेच राहुलनं एज गॅपवर भाष्य केलं आहे.

‘माझ्या आई-वडिलांच्या वयातही 10 वर्षांचा गॅप होता’

एका मुलाखतीत बोलताना राहुल देव म्हणाला, “आमच्या दोघांमध्ये 14 वर्षांचं अंतर आहे. सुरुवातीला मला यामुळे परेशानी झाली होती. नंतर मला याची जाणीव झाली की, माझ्या आई-वडिलांच्या वयातही 10 वर्षांचं अंतर होतं. तसं पण हे एवढं मोठं अंतर नाहीये. मला असं वाटतं की, जोपर्यंत तुम्ही खुश आहात तुमचा एज गॅप मॅटर करत नाही.”

राहुलनं हेही सांगितलं की, मुग्धा गोडसेची आणि त्याची भेट 2013 मध्ये मित्राच्या लग्नात झाली होती. इथेच दोघांची ओळख झाली आणि दोघांमध्ये जवळीकता वाढू लागली. राहुलची पहिली पत्नी रीना हिचा 2009 साली कॅन्सरनं मृत्यू झाला होता.

राहुलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं 2017 साली आलेल्या मुबारकां या सिनेमात काम केलं आहे. अनीस बज्मीनं हा सिनेमा डायरेक्ट केला होता. या सिनेात अनिल कपूर, इलियाना डिक्रूज आणि अथिया शेट्टी यांनीही काम केलं होतं.

मुग्धाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं शर्मा जी की लग गई या सिनेमात तिनं काम केलं आहे. या सिनेमात शर्मन जोशी, विक्रम सिंह, बिदिता बेग, माही सोनी, जरीना वहाब आणि शिशिर शर्मा यांनीही काम केलं आहे.