
Rahul Dravid | ड्रेसिंग रुममध्ये भावनिक वातावरण पाहून राहुल द्रविड नि:शब्द, म्हणाला – ‘मला त्यांच्याकडे पाहावत नव्हते…’
मुंबई : Rahul Dravid | ऑस्ट्रेलियाने काल अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium Ahmedabad) भारताचा पराभव केला आणि संपूर्ण देशात शांतता पसरली. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ १२ वर्षांनंतर वर्ल्ड कप (World Cup 2023) खेचून आणणार असे वाटत असतानाच स्वप्न भंगले. ग्लेन मॅक्सवेलने शेवटची धाव काढत विश्वकप पटकावल्यानंतर रोहितसह (Rahul Dravid) टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंचे डोळे पानावले.
गेला दीड महिना भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंना हसताना-खेळताना पाहिले, त्यांना असे भावनिक झालेले पाहून मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील नि:शब्द झाले होते. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत राहुल द्रविड म्हणाला, हे निराशाजनक आहे, ड्रेसिंग रुममध्ये प्रत्येक खेळाडू भावनिक झाला होता. एक प्रशिक्षक म्हणून मला त्यांच्या सामोरे जाण्याची हिंमत होत नव्हती.
राहुल द्रविड (Rahul Dravid) म्हणाला, मला माहित आहे या पोरांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती मेहनत घेतली. त्यामुळे एक कोच म्हणून त्यांना असे पाहावत नव्हते. या सर्व पोरांना मी वैयक्तिक ओळखतो.
राहुल पुढे म्हणाला, मागील काही महिन्यांत या पोरांनी प्रचंड मेहनत घेतली. परंतु खेळात असे घडत असते.
त्या दिवसाचा सर्वोत्तम संघ जिंकतो. पराभवातून शिकलो आहोत आणि इतरांप्रमाणे पुढे जाऊ.
एक खेळाडू म्हणून हिच अपेक्षा आहे. खेळात चढ-उतार येतात, परंतु थांबून चालत नाही.
कारण, प्रयत्न केले नाहीत, तर पुनरागमन कसे करणार.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जाताना पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले
पत्नीबाबत अपशब्द बोलणे भोवले ! नर्हेच्या डोंगराजवळ तरुणाचा खून, सराईत गुन्हेगाराला अटक
पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक
पुणे शहरात विविध भागात घरफोडी, दागिने, रोख रक्कम, विदेशी चलन चोरीला
वडेट्टीवारांमधील विरोधी पक्षनेता जागा झाला! भुजबळांनाच म्हणाले – ‘सत्तेत असून ओबीसींच्या समस्या…’