कलम ३७० ! ‘फक्त PM मोदींना विरोध म्हणून राहुल गांधी शत्रूची बाजू घेतात’, मुस्लीम धर्मगुरूंचा ‘संताप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियातील मुस्लीम धर्मगुरु इमाम मोहम्मद तौवहिदी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. दोघांवर टीका करताना मुस्लीम धर्मगुरु इमाम मोहम्मद तौवहिदी यांनी म्हटले कि, केवळ मोदींना विरोध करण्यासाठी राहुल गांधी शत्रूंची मदत घेतात. त्याचबरोबर ते केवळ स्वतःच्या स्वार्थासाठीच कॅमेऱ्यासमोर रडतात असा घणाघाती आरोप देखील केला आहे.

त्याचबरोबर त्यांनी भारताने रद्द केलेल्या कलम ३७० वर देखील भाष्य करत ट्विट केले आहे. यामधील एका ट्विटमध्येच त्यांनी हे आरोप केले आहेत. त्यांनी ट्विटमध्ये भाजप सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करत काश्मीर हा भारताचा भाग असल्याचे देखील त्यांनी म्हटले. त्याचबरोबर या निर्णयावर विरोध करणाऱ्यांवर देखील त्यांनी टीका केली आहे. यामध्ये त्यांनी प्रामुख्याने काँग्रेस नेत्यांवर टीका केली आहे.

राहुल गांधी यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले कि, राहुल गांधी हे अत्यंत वाईट राजकारणी आहेत. ते केवळ मोदींना विरोध करण्यासाठी शत्रूंची मदत घेतात.सोनिया गांधी देखील तशाच आहेत. हे दोघेही केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी काम करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे मुरब्बी राजकारणी नाहीत, असेदेखील त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like