राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास देशाचे कार्टून नेटवर्क होईल : आदित्य ठाकरे

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – देशाला पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही. राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास देशाचे कार्टून नेटवर्क होईल. असे वक्तव्य युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे. शिर्डी येथे शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्यांनी म्हंटले.

लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्यातील मतदान झाले आहे. येत्या २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यामुळे मतदान राहिलेल्या मतदार संघांमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. याचदरम्यान शिर्डी लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी, आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. देशाला पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही. राहुल गांधी जर देशाचे पंतप्रधान झाले तर देशाचे काय होईल. आपला देश कुठं जाईल राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास देशाचे कार्टून नेटवर्क होईल. मी तुम्हाला विचारतो देशाचे पंतप्रधान कोण सांगा मोदींशिवाय आहे का दुसरा पर्याय. विरोधकांकडे तर दुसरे नावही नाही. असे आदित्य ठाकरे यांनी म्हंटले.

याचबरोबर, मी आपल्या खासदारांच्या प्रचारासाठी येथे आलोय. त्यांच्या कामाची माहिती देण्यासाठी येथे आलोय. कुणीही १० कोटी रुपयांची ऑफर स्विकारली असो. मात्र आपले खासदार मी जनतेतून आलोय, जनतेचीच कामे करणार असे म्हंटले. असे म्हणत त्यांनी सदाशिव लोखंडे यांचे कौतुकही केले.