…म्हणून राहुल गांधी करणार नाही वाढदिवस साजरा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राहुल गांधी यांचा आज ४९ वा वाढदिवस आहे. बिहारच्या मुजफ्फरपूर व परिसरात चमकी तापामुळे (अ‍ॅक्यूट इन्सेफलाइटिस सिंड्रोम) १०० हून लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राहुल गांधी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते आणि लहान मुलांशी सवांद साधणार आहेत.

वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी मनोकामना व्यक्त केली आहे.

राहुल गांधी यांचा जन्म १९ जून १९७० मध्ये झाला. ते पहिल्यांदा २००४ मध्ये अमेठीमधून खासदार म्हणून निवडून आले. त्यांनतर ही राहुल २००९ ते २०१४ ला पुन्हा अमेठीमधून खासदार झाले. मात्र २०१९ मध्ये राहुल गांधी यांना अमेठी या पारंपारिक मतदारसंघात पराभव सहन करावा लागला. अमेठी लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या स्मृती इराणी निवडून आल्या तर केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात राहुल गांधींना विजय मिळाला. २०१७ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीच्याआधी राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष बनले होते. देशभरात काँग्रेसचा झालेला पराभव जिव्हारी लागल्याने राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त-

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन