ठोको ताली ! नवज्योत सिध्दूची ‘लॉटरी’, ‘मोठं’पद मिळणार ; कॅप्टन अमरिंदर यांच्याशी वाद मिटण्याची शक्यता

चंदीगड : पोलीसनामा ऑनलाइन – नुकतीच दिल्लीला जाऊन राहूल आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतल्यानंतर नवज्योत सिद्धू यांना काँग्रेस पक्षात मोठे पद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याबरोबरील वाद देखील मिटण्याचे चिन्हे आहेत. प्रदेश काँग्रेस कडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील २ दिवसांत सिद्धू आपल्याला नव्याने दिल्या गेलेल्या विद्युत आणि पारंपरिक ऊर्जा मंत्रिपदाचा भार स्वीकारतील. याबरोबरच पार्टी सिद्धू यांना काँग्रेस पक्षात मोठी जबाबदारी देताना राष्ट्रीय महासचिवाचे पद देण्याची शक्यता आहे.

का घेतली सिद्धू यांनी राहुल, प्रियंका यांची भेट
६ जून च्या कॅबिनेटमंत्र्यांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सिद्धू सहित अनेक मंत्र्यांच्या विभागांमध्ये फेरबदल केला होता. या निर्णयानंतर सिद्धू यांचे स्थानिक स्वराज्य संस्था आणि पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाचे मंत्रिपद काढून घेऊन त्यांना विद्युत आणि पारंपरिक ऊर्जा मंत्रिपदाचा भार सोपविला होता. लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी स्थानिक स्वराज्य संस्था विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करत सिद्धू यांचे मंत्रिपद काढून घेण्याबद्दल वक्तव्य केले होते. त्यानंतर सिद्धूचा झालेला खातेबदल म्हणजे एकप्रकारे कारवाईच असल्याचे बोलले जात होते.

राहुल यांची भूमिका काय
यामुळे नाराज झालेल्या सिद्धू यांनी दिल्लीला जाऊन राहूल आणि प्रियांका गांधी यांची भेट घेऊन कॅप्टन यांची तक्रार केली आणि आपले पूर्वीच्या खात्याचे मंत्रिपद परत मागितले. मात्र राहुल यांनी त्यांना नवीन मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद मिळण्याच्या अटीवर नवीन खात्याचे मंत्रिपद स्वीकारू असे सांगितले. राहुल गांधी यांनी उपमुख्यमंत्रीपद देण्याच्या मागणीस नकार दर्शविला मात्र पार्टीमध्ये लवकरच मोठी जबाबदारी देण्याचे आश्वासन मात्र दिले. सिद्धू यांना राष्ट्रीय स्तरावर नवीन ओळख देणार असल्याचे सांगितले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिद्धू यांनी राहुल यांची हि गोष्ट मेनी केली मात्र राहुल यांच्या सूचनेनुसार चंदीगड परतल्यानंतर मात्र यासंदर्भात पूर्णतः मौन बाळगले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री कॅप्टन यांनीदेखील काहीही वक्तव्य केलेले नाही. या मुद्द्यासंदर्भात सिद्धू आणि कॅप्टन दोघेही माध्यमांपासून लांब राहिले आहेत.

आरोग्यविषयक बातम्या

आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत लिंबाची पाने

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

योगासनांमध्ये ‘सातत्य’ असणे फायद्याचे