गटारीतून गॅस काढूनच दाखवा, मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याची राहुल गांधींकडून खिल्ली

नवी दिल्ली: वृत्तसंस्था- काही दिवसांपूर्वी मोदींनी एका सभेत गटारीतून गॅस काढून त्यावर स्वयंपाक करण्याचा किस्सा सांगितला होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याची चांगलीच खिल्ली उडवली आहे.राहुल गांधींनी मोदींनाच बोलबच्चन म्हणत माझ्या समोर तो गॅस पाईप आणा बघुयात कसा गॅस निघतो ते, असे खुले आव्हान दिले आहे.

मोदींनी सांगितलेल्या किस्स्य़ानुसार एक धाबा चालवणाऱ्या माणसाने गटारीवर स्टीलचे पातेले ठेवले. त्याला छिद्र पाडून त्यातून एक पाईप काढला. त्या पाईपमधून गॅस निघाला आणि त्याने त्यावर स्वयंपाक केला. असे बोलबच्चन देण्याऐवजी माझ्या समोर येऊन गटारीतून गॅस काढून दाखवा, असे आव्हान राहुल गांधींनी मोदींना यावेळी दिले.

राहुल गांधींनी यावेळी राफेलवरूनही मोदींवर निशाणा साधला. राफेलवर आम्ही त्यांना चारच प्रश्न विचारले. मात्र, देशाचा चौकीदार डोळ्यात डोळे घालून आमच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकला नसल्याचे ते म्हणाले. कालच मी गोव्याचे मुख्यमंत्री व त्यावेळचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांना भेटलो. त्यांनीसुद्धा राफेल कराराची बोलणी होताना पंतप्रधानांनी संरक्षणमंत्र्यांशी चर्चा केली नसल्याची माहिती दिल्याचे राहुल गांधी यावेळी म्हणाले.