Rahul Gandhi | राहुल गांधींचा RSS वर निशाणा; म्हणाले – ‘महात्मा गांधींच्या आजूबाजूला महिला दिसायच्या, मोहन भागवत यांच्यासोबत का नाही?’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी भाजप (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप आणि संघ महिलांना पुढे येऊ देत नाही, असा घणाघाती आरोप राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे. याच वेळी त्यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या फोटोमध्ये साधारणपणे 2-3 महिला दिसतात. पण मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या फोटोत महिला का दिसत नाहीत ? असा सवाल त्यांनी केला आहे. महिला काँग्रेस स्थापना दिन कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते

राहुल गांधी म्हणाले, मोहन भागवत यांची संघटना आरएसएस महिला शक्तीला (Women’s power) दाबण्याचे काम करते.
तर काँग्रेस संघटना महिलांना पुढे जाण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देते. ते पुढे म्हणाले, आरएसएसने आजपर्यंत कोणत्याही महिलेला पंतप्रधान (Prime Minister) केले नाही. मात्र काँग्रेसने एका महिलेला देशाचे पंतप्रधान केले. भाजप सरकारने (BJP government) लक्ष्मी आणि शक्तीला घरातून बाहेर काढले आहे. सरकारने असे धोरण लागू केले आहे की, आज लोकांकडे पैसे नाहीत. नोटाबंदी, जीएसटी आणि कृषी कायदे, यांसारखी समाजविरोधी धोरणे राबवून, या सरकारने लक्ष्मीची संपूर्ण शक्ती आपल्या चार-पाच लोकांच्या हातात सोपवली आहे.

महिला काँग्रेस स्थापना दिन कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले, जेव्हा आपण महात्मा गांधींचा फोटो पोहतो, तेव्हा आपल्याला त्यांच्या आजूबाजूला दोन ते तीन महिला दिसतात.
याउलट आपण कधी मोहन भागवत यांचा एखाद्या महिलेसोबत फोटो पाहिला आहे ? कारण त्यांची संघटना महिलांना दडपण्याचे काम करते आणि आमचा पक्ष त्यांना व्यासपीठ देते.

हे देखील वाचा

Pune News | पुणेरी निषेध ! चुक नसताना गाडी उचलल्याने पठ्ठ्यानं निषेध म्हणून गाडीचं ‘स्मारक’ उभारलं

Time Magazine Top 100 influential list | टाइम मॅगझीन लिस्ट ! जगातील 100 प्रभावशाली लोकांमध्ये PM मोदी, CM ममता बॅनर्जी, ‘सीरम’चे CEO अदर पूनावाला

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Rahul Gandhi | congress leader rahul gandhi ask mahatma gandhi seen women around him why mohan bhagwat not

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update