Rahul Gandhi | ‘मी हँडसम दिसतो का?’ राहुल गांधींच्या प्रश्नावर सोनिया गांधींनी दिले ‘हे’ उत्तर

जळगाव : पोलिसनामा ऑनलाईन – काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) गेले काही दिवस ‘भारत जोडो यात्रेत’ (Bharat Jodo Yatra) असून या यात्रेमार्फत ते भारतीय जनतेशी स्वतःला जोडून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील (Maharashtra) टप्पा ७ नोव्हेंबर रोजी सूरु झाला आणि १४ दिवस महाराष्ट्रातून प्रवास केल्यानंतर काल ते महाराष्ट्रातून मध्य प्रदेशसाठी (Madhya Pradesh) रवाना झाले. दरम्यान त्यांनी एका युट्युबरशी बोलताना त्यांची आई सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि त्यांच्यातील (Rahul Gandhi) एक किस्सा सांगितला आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एकदा त्यांच्या आईला, मी हँडसम दिसतो का? असा प्रश्न केला होता. त्यावर सोनिया गांधी यांनी त्यांना खरे खरे उत्तर दिले. ‘नाही, हँडसम (Handsome) नाही. पण, ठीकठाक दिसतोस.’ असे त्या उत्तरल्या. राहुल गांधी यांनी यूट्यूबर समदीश भाटिया (Samdish Bhatia) याला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितला. “मी लहान असताना आईजवळ जाऊन विचारायचो की, मी हँडसम दिसतो का? तेव्हा आई माझ्याकडे पाहायची आणि म्हणायची, ‘नाही . तू ठिकठाक दिसतोस.’ माझी आई अशीच आहे. ती तुम्हाला आरसाच दाखवते. माझे वडीलही असेच होते. माझे संपूर्ण कुटूंब असेच आहे. इथे तुम्हाला थेट सत्याचा सामना करुन दिला जातो. खोटी स्तुती करणे माझ्या कुटुंबीयांना कधीच जमले नाही”, अशी माहिती राहुल गांधींनी दिली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील टप्पा संपला आहे.
काल या टप्प्याच्या समारोपावेळी बोलताना ते म्हणाले, ‘माझा महाराष्ट्रातील अनुभव अतिशय समृद्ध करणारा होता.
महाराष्ट्राने मला प्रेम आणि विश्वास दिला, याचा मी आभारही आहे.
‘ शिवाय, राहुल गांधींनी मोदी सरकारवर पंचायत आणि अनुसूचित क्षेत्र विस्तार कायदा (PESA कायदा),
वन हक्क कायदा, जमीन हक्क, पंचायत राज कायदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षण यासारखे
कायदे सौम्य केल्याचे आरोप केले. काँग्रेस सत्तेत आल्यावर हे कायदे आणखी मजबूत केले जातील,
याची शाश्वती दिली.

Web Title :- Rahul Gandhi | Congress leader rahul gandhi bharat jodo yatra mom how i was looking share his story