राहुल गांधींच्या वक्तव्यावरून लोकसभेत ‘धुक्का-बुक्की’, मंत्र्याच्या खुर्चीजवळ पोहचले काँग्रेसचे खासदार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेत शुक्रवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विधानावरुन गोंधळ झाला. हा गोंधळ इतका वाढला की याचे रुपांतर धक्का-बुक्कीत झाले. एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी राहुल गांधी यांच्या एका वक्तव्यावर बोलण्यास सुरुवात केली आणि टीका करण्यास सुरुवात केली. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी थांबण्याची विनंती केली.

या दरम्यान काँग्रेस खासदार मनिकम टागोर, हर्षवर्धन यांच्या जागेपर्यंत पोहचले आणि दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरु झाला. त्यानंतर भाजपचे खासदार वेलमध्ये आले आणि काँग्रेसचे खासदार मनिकम टागोर यांना पकडले त्यामुळे त्याचे रुपांतर धक्काबुक्कीत झाले. त्यानंतर ओम बिर्ला यांनी सदनाचे कामकाज स्थगित केला.