Rahul Gandhi Disqualification | शिक्षा झाली मात्र आमदारकी गेली नाही, राहुल गांधी यांच्यावरील कारवाईनंतर महाराष्ट्रातील ‘हे’ आमदार चर्चेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rahul Gandhi Disqualification | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आडनावावरुन काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केले होते. या विधानावरुन सुरत कोर्टाने (Surat Court) राहुल गांधी यांनी शिक्षा सुनावली. त्यानंतर 24 तासाच्या आत संसदीय समितीने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द (Rahul Gandhi Disqualification) केली. यावरुन राजकीय (Political News) वातावरण चांगलेच तापले आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द (Rahul Gandhi Disqualification) केल्यानंतर महाराष्ट्रातील (Maharashtra) आमदारांना (MLA) कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतरही ते पदावर कायम आहेत. त्यांच्यावर अद्याप अपात्रतेची कारवाई केली नाही. त्यामुळे आता पक्ष किंवा व्यक्ती पाहून कारवाई केली जाते का? असा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.

शिक्षा झालेले मात्र पद कायम असलेले नेते कोण?

आमदार सुधीर पारवे – भाजप आमदार सुधीर पारवे (BJP MLA Sudhir Parve) यांना एका फौजदारी प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यांनी दोन टर्म पूर्ण केल्या. मात्र तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. परंतु प्रकरणाचा अंतीम निकाल आल्यानंतर त्यांना अपात्र ठरवण्यात आले.

अर्जून खोतकर (शिवसेना) – पूर्वीचे शिवसेनेचे आणि आताचे शिंदे गटाचे (Shinde Group) माजी आमदार अर्जुन खोतकर (Former MLA Arjun Khotkar) हे 1990 साली पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यावेळी त्याचे वय केवळ 22 वर्षे होते. आमदार होण्यासाठी 25 वर्षांची वयोमर्यादा असताना खोतकर यांनी निवडणूक लढवून ती जिंकली देखील. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सुनावणीला विलंब झाला. परिमाणी खोतकर यांनी आमदारकीची टर्म पूर्ण केली. त्यानंतर देखील त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही.

रत्नाकर गुट्टे (रासप)- परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील 27 हजार शेतकऱ्यांच्या नावावर 5500 कोटी रुपयांचे पीककर्ज घेतल्या प्रकरणी आमदार रत्नाकर गुट्टे (MLA Ratnakar Gutte) यांना शिक्षा झाली होती. मात्र त्यांच्यावर अपात्रतेची कोणतीच कारवाई झाली नाही. विशेष म्हणजे गुट्टे यांनी तुरुंगातून निवडणूक लढवली आणि ते या निवडणुकीत विजयी देखील झाले.

बच्चू कडू (प्रहार) – आक्रमक आमदार (MLA Bacchu Kadu) म्हणून ओळखले जाणारे
प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा
(Municipal Commissioner Abhishek Krishna) यांच्या कानशिलात लगावली होती.
त्यानंतर पाच वर्षांनी या प्रकरणात निकाल लागला. कोर्टाने बच्चू कडू यांना शिक्षा सुनावली.
मात्र, अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली नाही.

यशोमती ठाकूर (काँग्रेस) – किरकोळ कारणावरुन काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर
(Congress MLA Yashomati Thakur) यांनी 2012 मध्ये एका वाहतूक पोलीस
(Traffic Police) कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. यानंतर या प्रकरणी अमरावती
न्यायालयाने ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. मात्र त्यांची आमदारकी कायम राहिली.

Web Title :- Rahul Gandhi Disqualification | mla-yashomati-thakur-bacchu-kadu
-ratnakar-gutte-were-not-disqualified-after-sentenced-in-maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Asia Cup 2023 | आशिया चषक 2023 पाकिस्तानात होणार ! टीम इंडियाच्या सामन्यांबाबत
घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

Congress Leader Rahul Gandhi | खासदारकी रद्द झाल्यावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया,
म्हणाले – ‘कोणतीही किंमत चुकवण्याची तयारी’