‘त्या’ वक्तव्यावरून राहूल गांधींनी सुप्रीम कोर्टात व्यक्त केला खेद 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॉंग्रसेचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी राफेलप्रकरणी केलेल्या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयात खेद व्यक्त केला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान उत्साहामध्ये माझ्याकडून ते वक्तव्य केलं गेलं. असं त्यांनी म्हटलं आहे. राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून केलेल्या ‘चौकीदार चोर है’  या वक्तव्याविरोधात भाजप नेत्या मिनाक्षी लेखी यांनी अवमान याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने २२ एप्रिल पर्यंत स्पष्टीकरण देण्याचा आदेश दिला होता. राहूल गांधींनी आपलं स्पष्टीकरण आज न्यायालयात सादर केलं.

सर्वोच्च न्यायायलात राफेलप्रकरणी सुरु असलेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर ‘चौकीदार चोर है’ हे वक्तव्य केलं होतं. त्यावेळी भाजपच्या खासदार मिनाक्षी लेखी यांनी याविरोधात अवमान याचिका दाखल केली होती. यावेळी सर्वोच्च न्यायायलायने म्हटलं होतं की,  न्यायालयासमोर केवळ त्यावेळी राफेलप्रकरणी सुरु असलेल्या खटल्यातील सुनावणीदरम्यान सादर केलेल्या पुराव्याच्या कागदपत्रांची स्विकारार्हता महत्त्वाची होती. त्यावर न्यायालयाने निर्णय दिला होता. त्यावर सर्वोच्च न्यालायाने राहूल गांधी यांनी हे चुकीचे वक्तव्य केले आहे. न्यायालयाने असं कुठेही म्हटलेलं नाही. त्यामुळे राहूल गांधी यांना २२ एप्रिल पर्यंत आपलं म्हणणं मांडण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता.

Loading...
You might also like