PM नरेंद्र मोदी आज कोणता मुद्दा करणार ‘हायलाईट’ ?

मोदी यांच्या राज्यात दोन सभा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारात सहभागी होत असून त्यांची जळगाव आणि भंडाऱ्यातील साकोली येथे सभा होणार आहे. या पूर्वीच्या लोकसभा तसेच अन्य राज्यातील विधानसभेच्या निवडणुक प्रचारात मोदी यांच्याभोवतीच सर्व प्रचार फिरला होता. राज्याची विधानसभा निवडणुक असली तरी राष्ट्रीय आणि भावनिक मुद्द्यांवर विधानसभा निवडणुक लढविली गेली होती.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही राज्यातील प्रश्नांऐवजी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काश्मीर आणि ३७० कलम रद्द करण्याच्या मुद्द्यावर भर दिला आहे. अन्य राज्यातून आलेले भाजपचे मुख्यमंत्री, मंत्री तसेच केंद्रीय मंत्री हे महाराष्ट्रातील समस्या, सरकारची कामगिरी याऐवजी ३७० हा मुद्दाच रेटून नेत आहे. ३७० चा मुद्दा भाजपाला निवडणुकीचा मुख्य मुद्दा बनवायचा आहे.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या दोन सभेत नेमके काय बोलतात, की तेही महाराष्ट्राच्या निवडणुकीत ३७० चा मुद्दा मुख्य बनवितात. की आणखी काही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Visit : Policenama.com