‘राहुल गांधी इटलीत जा !’ शेतकऱ्यांची घोषणाबाजी

अमेठी : वृत्तसंस्था – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यानी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे. अमेठी या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघामध्ये राहुल गांधी यांनी आपले दौरे वाढवले आहेत. पंरतु अमेठी दौऱ्यादरम्यान त्यांना शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. अमेठीमध्ये असताना तेथील शेतकऱ्यांनी  ‘राहुल गांधी इटलीला जा’ अशी घोषणाबाजी केली.

गौरीगंज येथील रहिवासी असणाऱ्या शेतकऱ्यांनी आंदोलन करत ‘राहुल गांधी इटलीला जा’ अशी घोषणाबाजी केली. समोर आलेल्या माहितीनुसार, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची  जमीन राजीव गांधी फाउंडेशनला देण्यात आलेली आहे. राहुल गांधीविरोधात घोषणाबाजी करताना, ‘आमची जमीन आम्हला परत द्या किंवा आम्हाला नोकऱ्या तरी द्या, अशी मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात आली.

सदर शेतकऱ्यांनी सम्राट सायकल कारखान्यासमोर आंदोलन केले. आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याने एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की,  राहुल गांधीमुळे आम्ही खूप दु:खी आहोत. त्यांनी आमची जमीन हडप केली आहे. शिवाय राहुल गांधी यांनी इटलीला निघून जावे अशी मागणीही केली. या कारखान्याचा  राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टकडे आहे. जैन बंधूंनी 1980 साली ही कंपनी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी कौसार येथील ही शेतकऱ्यांची जमीन घेतली होती. पुढे न्यायालयाने ही जमीन उत्तर प्रदेश औद्योगिक विकास प्राधिकरणाकडे सोपवण्याचे आदेश दिले होते. मात्र राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टने अद्याप या जमिनीवरील ताबा सोडलेला नाही.

सम्राट सायकल कारखान्याची पायाभरणी राजीव गांधी यांनी केली होती. शेतकऱ्यांची जमीन हडप झाल्याने येथील शेतकऱ्यांचा  नाराजीचा सूर असून त्यांनी त्यांची ही जमीन आता परत हवी आहे असे समजत आहे.