आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना १७ रुपये देऊन थट्टा करणार नाही

भोपाळ : मध्य प्रदेश वृत्तसंस्था – लोकसभेच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत तशी राजकीय चिखल फेक वाढीला लागली आहे. भोपाळमध्ये जाहीर सभा घेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली आहे.नरेंद्र मोदींनी राफेल घोटाळ्यात ३० हजार कोटी रुपये गडप केले असा आरोप राहुल गांधी यांनी या सभेत केला आहे. वर्षाला सहा हजार रुपये देऊन मोदी सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे असा हल्ला देखील राहुल गांधी मोदींवर चढवला आहे.

काँग्रेसला संपवायला निघालेल्या मोदींना मी सांगू इच्छितो कि अनेक राज्यात काँग्रेस सत्तेत आली आहे. तर आगामी काळात देशात हि काँग्रेसचे सरकार येणार आहे. काँग्रेसचे सरकार आले तर आम्ही प्रत्येक गरिबाला किमान उत्पन्न देण्याची हमी देणार आहे. दिवसाला १७ रुपये देऊन शेतकऱ्यांची थट्टा करणार नाही असे राहुल गांधी म्हणाले आहेत.

याच सभेस संबोधित करताना मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बलात्कार, खून, बेरोजगारी, महिलांवरचे अत्याचार या मध्ये मध्य प्रदेश हे राज्य पहिल्या क्रमांकाचे राज्य होते. भाजपच्या काळात या राज्याचा विकास थांबला होता. मात्र आता आम्ही या राज्याला विकासाच्या मार्गात गतिमान करणार आहे. तसेच राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सर्वस्व झोकून देणार आहे असे कमलनाथ म्हणाले आहेत.