Rahul Gandhi | मनसेने आमच्या सभेत गोंधळ घातला, तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ – काँग्रेस

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस (Congress) नेते, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात चालत आहे. या यात्रेला महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते हजेरी लावत आहेत. एका ठिकाणी भाषणात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (V. D. Savarkar) यांच्याविषयी भाष्य केले होते. त्यावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. भाजप, शिंदे गट आणि मनसे (MNS) राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक झाले आहे. ठिकठिकाणी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा निषेध करण्यात येत आहे. मनसे शेगाव येथील सभेत राहुल गांधींचा निषेध करणार आहे, असे म्हंटले आहे. त्याला आता युवक काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे.

 

ज्याप्रकारे मनसेने आमच्या सभेत येण्याचे आव्हान दिले आहे, त्याप्रमाणे आमचे कार्यकर्ते देखील तेथे उपस्थित राहणार आहेत. शेगावमध्ये राहुल गांधींची (Rahul Gandhi) खूप मोठी सभा होईल. अंदमान निकोबारमध्ये ज्यावेळी युद्ध घडले, तेव्हा मोठ्या प्रमाणात वीर तयार झाले. पण यांना माफीविरांची आठवण जास्त येते. त्याचा आम्ही निषेध करतो, असे राज्याचे युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) म्हणाले आहेत.

 

आम्ही अनेक कार्यकर्ते या सभेत असणार आहोत. मनसे ज्या भाषेत विरोध करेल, त्याच भाषेत आम्ही त्यांना उत्तर देऊ. आम्ही जवळपास 30,000 च्या संख्येने त्या ठिकाणी असणार आहे. या सभेला जास्तीत जास्त लोक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मनसेने शेगाव सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ.

अकोल्याच्या सभेत राहुल गांधी म्हणाले, माझ्याकडे सावरकरांचे पत्र आहे. त्यात त्यांनी इग्रजांची माफी मागितली आहे.
त्यात त्यांनी इंग्रजांचा सेवक होण्याची विनंती केली होती.
उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि सरसंघचालक (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी ते पत्र पाहावे.
सावरकरांनी इंग्रजांना मदत केली होती. त्यांना त्यांच्याकडून पेन्शन मिळत होती.
आमच्या यात्रेमुळे देशाचे नुकसान होत असेल, तर यात्रा थाबंवून दाखवावी.
आमच्या आणि भाजपच्या राजकारणात हाच फरक आहे. भाजप दबाव टाकत आहे. आम्ही हुकुमशाही मानत नाही,
असेही राहुल गांधी म्हणाले होते.

 

Web Title :- Rahul Gandhi | If MNS disturbs our assembly, let us answer them in their own language – Congress

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Suicide attempt at Ministry | प्रियसीला न्याय मिळावा म्हणून तरुणाचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Nitin Gadkari | पश्चिम बंगालमधील कार्यक्रमात नितीन गडकरींना भोवळ

Janhvi Kapoor | जान्हवी कपूरने सोडली सगळी लाज, कॅमेऱ्यात कैद झाले ‘या’ अवस्थेतील फोटो