अमेरिकन हिंसाचाराचा संदर्भ देत राहुल गांधींचा मोदी सरकारवर ‘निशाणा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी असहिष्णुतेचा मुद्दा पुन्हा उचलला आहे. त्यांनी अमेरिकेत सुरू असलेल्या आंदोलाची तुलना भारताशी करत दोन्ही देशांमध्ये असहिष्णुतेचे वातावरण वाढत असल्याचे म्हटले आहे.

कोरोना व्हायरसचा जगावर कोणता परिणाम होत आहे या विषयावर राहुल गांधी यांनी निकोलस बर्न्स यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी कोरोना व्यतिरिक्त भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर आणि दोन्ही देशांच्या सद्यस्थितीवरही चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये सध्या असे सरकार आहे जे स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवून घेत आहे. परंतु समाजामध्ये दुरावा निर्माण करण्याचे काम करत आहे, असे राहुल गांधी म्हणाले. लॉकडाउनवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करीत गांधी यांच्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर बोलताना निकोलस यांनी अमेरिका लवकरच यातून बाहेर पडेल असेही नमूद केले. तुमच्या देशाबद्दल मला इतकी माहिती नसल्याने मी कोणतही वक्तव्य करणार नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये एक समानता आहे. दोन्ही देश सहिष्णू आहेत. परंतु दोन्ही देशांमध्ये असलेली महत्त्वपूर्ण बाब आता नाहीशी होताना दिसत आहे. यावेळी च्यांनी अमेरिकेत होत असलेल्या हिंचारावरही बोट ठेवलं. अमेरिकेत ज्याप्रकारे आफ्रिकन-अमेरिक, अमेरिकन-मॅक्सिकन यांच्या दुरावा निर्माण केला जात आहे. भारतात हिंदू मुस्लिम यांच्यात दुरावा निर्माण केला जात आहे. मी भारताच्या डीएनएला चांगल्या प्रकारे ओळखतो आणि समतोही. लवकर सर्व समस्यांचं निराकरण होईल, अशी मी आशा करतो, असंही ते म्हणाले.