‘राहुल गांधी काही डॉक्टर नाहीत, त्यांनी डेमो पहावा’ ! व्हेंटिलेटरच्या आरोपांवर कंपनीचं प्रत्युत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी रुग्णांकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यातच काँग्रेसेचे खासदार राहुल गांधी यांनी रविवारी सरकारवर हल्ला चढविला. राहुल गांधी म्हणाले की, पीएम केअर्स फंडाचा वापर करीत कोविड-19 रुग्णांसाठी कमी दर्जाचे व्हेंटिलेटर खरेदी केले जात आहेत. पीएम केअर्समधील अस्पष्टतेमुळे भारतीयांचे जीव धोक्यात येत आहेत. आणि निकृष्ट साहित्य खरेदी करण्यासाठी सार्वजनिक पैशांचा उपयोग केला जा आहे.

राहुल गांधी यांनी व्हेंटिलेटरवर केलेल्या वक्तव्यावर व्हेंटिलेटर बनवणारी कंपनी अ‍ॅगवा व्हेंटिलेटरचे सह-संस्थापक प्रोफेसर दिवाकर वैश यांनी स्पष्टीकरण दिले आहे. वैश म्हणाले की व्हेंटिलेटरशी संबंधित बातम्यांची तपासणी न करता राहुल गांधी रिट्विट केले. ते पुढे म्हणाले की, राहुल गांधी डॉक्टर नाहीत, त्यांना व्हेंटिलेटर कसे तपासायचे हे माहित नाही.

दिवाकर वैश यांनी पुढे म्हटले आहे की, भारतीय व्हेंटिलेटर्स कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाऊ नये ही आंतरराष्ट्रीय निर्मात्यांची इच्छा आहे. आणि म्हणूनच ते स्वदेशी प्रयत्न थांबवू पाहत आहेत. तर राहुल गांधी यांनी हवे असल्यास मी व्हेंटिलेटर कसे कार्य करते याचा डेमो देऊ शकतो.