‘राहुल गांधी 50 वर्षांचा असला तरी बालबुद्धी असलेला नेता’ 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राहुल गांधी बालबुद्धी असलेला नेता आहे. अशी टीका भाजपा खासदार पूनम महाजन यांनी केली असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर त्यांनी निशाणा साधाला आहे. इतकेच नाही तर, राहुल गांधी 50 वर्षांचा असला तरी बालबुद्धी असलेला नेता आहे असा एकेरी उल्लेख करत भाजपा खासदार पूनम महाजन यांनी अतिशय बोचऱ्या शब्दात राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. कुर्ला येथील गृहप्रकल्पाच्या कार्यक्रमात बोलताना पूनम महाजन यांनी राहुल गांधी यांना टार्गेट केले. राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेचा दाखल देत त्यांनी राहुल यांच्यावर खरमरीत शब्दात टीका केली.

‘जरा याद उन्हे भी कर लो’ 

राहुल गांधींनी स्क्वेअर मीटर आणि स्क्वेअर इंच यामधला फरक सांगावा
कुर्ल्यातील कार्यक्रमात बोलताना पूनम महाजन म्हणाल्या की, “राहूल गांधींनी आधी स्क्वेअर फूट, स्क्वेअर मीटर आणि स्क्वेअर इंच यामधला फरक सांगावा. मी माझं नाव बदलून ठेवेल.” अशा शब्दात पूनम महाजन यांनी राहुल गांधी यांना आवाहन दिलं आहे.
राहुल गांधी 50 वर्षांचा असला तरी बालबुद्धी असलेला नेता
दरम्यान, राहुल यांनी मुंबईतील सभेत बोलताना, 500 स्केअर फूटची घरे देण्याचं आश्वासन मुंबईकरांना दिलं होतं. याच त्यांच्या वक्तव्याचा पूनम महाजन यांनी समाचार घेत राहुल गांधी यांना लक्ष्य केले आहे. यावेळी बाेलताना, पूनम महाजन म्हणाल्या की, “50 वर्षांचा युवक राहुल गांधी वांद्र्यात येऊन गेला. त्यावेळी 500 स्वेअर फूटची घरे देण्याचं आश्वासन देऊन गेला. पण, 50 वर्षांचा असला तरी हा बालबुद्धी असलेला नेता आहे.” असे म्हणत त्यांनी राहुल गांधींवर बोचरी टीका केली आहे.
याशिवाय राहुल गांधींवर तोंडसुख घेताना पूनम महाजन असेही म्हणाल्या की, “राहुल गांधी मोदीसोबत वाद विवाद घालण्याची भाषा करतो, आधी माझ्यासोबत वाद घालून दाखवा.”
मुख्यमंत्री महाराष्ट्रातील जनतेसाठी अहोरात्र झटत आहेत
मुख्य म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळताना पूनम महाजन म्हणाल्या की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील जनतेसाठी अहोरात्र झटत आहेत. जनतेला घरे देण्यासाठी ते प्रयत्नशील असून प्रत्येक बाबींचा पाठपुरावा करत आहेत. 2022 पर्यंत सर्वांना घर हा प्रकल्प म्हणजे मुंबईला वर्ल्ड क्लास सिटी बनविण्याची चावी आहे.”असेही त्या म्हणाल्या.