ना ‘सिम कार्ड’ मिळतं, ना ‘लोन’… या राहुल गांधीचा प्राब्लेम कोणीच समजत नाही

इंदोर : वृत्तसंस्था – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सर्वांना माहित आहेत. पण आपल्या देशात अजून एक राहुल गांधी आहे हे तुम्हाला माहित आहे का? जो व्यावसाय करतो. जो इंदोरच्या अखंडनगर येथे राहणारा एक सामान्य युवक आहे. मात्र त्याला त्याच्या नावामुळे सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, राहुलला त्याच्या गांधी आडनावामुळे कोणतीही बँक कर्ज देण्यास तयार होत नाहीये, की त्याला कोणती टेलीकॉम कंपनी नंबर देण्यास तयार होत नाही. त्यामुळे त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

न सिम मिल रहा है, न लोन...इस राहुल गांधी की दिक्कत कोई नहीं समझता!

राहुलचे आडनाव गांधी असल्याने त्याची अनेक ठिकाणी खिल्ली उडवली जात आहे. तर अनेक लोक काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी तुलना करत खोटी आयडी तर बनवली नाहीना, असं म्हणत आहेत. राहुल यांनी एकदा व्यावसायासाठी कर्ज घेण्यासाठी बँकेत फोन केला होता, तर तेव्हा त्यांची खिल्ली उडवण्यात आली. बँकेतील ज्या व्यक्तीने फोन उचलला त्यांना राहुलने पूर्ण नाव सांगताच राहुल गांधी इंदोरला कधी स्थायिक झाले, अशी खिल्ली उडवत फोन कट केला.

न सिम मिल रहा है, न लोन...इस राहुल गांधी की दिक्कत कोई नहीं समझता!

एवढेच नाहीतर राहुल गांधी यांनी सिमकार्ड साठी अर्ज केला तर त्यातही त्यांच्या आडनावामुळे त्यांना सीमकार्ड देण्यात आले नाही. अखेर त्यांनी आपल्या भावाच्या नावावर सीमकार्ड विकत घेतले.

न सिम मिल रहा है, न लोन...इस राहुल गांधी की दिक्कत कोई नहीं समझता!

दरम्यान, या सर्व त्रासाला कंटाळून या राहुल नावाच्या युवकाने आपल्या गांधी आडनावाच्या जागेवर मालवीय लावायला सुरुवात केली आहे. ज्याने लोक त्याची मस्करी करणार नाही. तसंच त्याने आता त्याच्या सर्व कागदपत्रांवरील आडनाव बदलण्यास सुरुवात केली आहे. ज्याने पुढे जाऊन त्यांना ड्रायव्हिंग लायसेंस बनवण्यास समस्या येणार नाहीत.

न सिम मिल रहा है, न लोन...इस राहुल गांधी की दिक्कत कोई नहीं समझता!

आरोग्यविषयक वृत्त –