Rahul Gandhi Maharashtra Tour | ‘महाराष्ट्रात राहुल गांधींच्या केसाला हात तर लावून दाखवा…’, काँग्रेसचे भाजपला थेट आव्हान

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मुंबई, महाराष्ट्र दौऱ्यावर (Rahul Gandhi Maharashtra Tour) येणार असल्याची राजकीय वर्तुळात (Maharashtra Political News) चर्चा आहे. राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाऊल ठेवण्यापूर्वी वीर सावरकर यांची माफी मागावी, मगच राज्यात पाय ठेवावा, असा धमकी वजा इशारा चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिला आहे. यानंतर आता काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जर भाजपात (BJP) धमक असेल तर महाराष्ट्रात राहुल गांधींच्या केसालासुद्धा हात लावून दाखवा असे खुले आवाहन त्यांनी दिलं आहे. राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरुन (Rahul Gandhi Maharashtra Tour) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

नाना पटोले भंडारा जिल्ह्यातील साकोळी येथे पत्रकारांशी बोलत होते. नाना पटोले म्हणाले, मी सावरकर नव्हे, राहुल गांधी आहे. हा गुन्हा होत असेल तर हा गुन्हा मी वारंवार करत राहणारा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) शेतकऱ्यांचा अपमान केला. त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली का, महाराष्ट्राचे आधीचे काळी टोपीवाले राज्यपाल कोश्यारींनी (Governor Koshyari) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), महात्मा फुले (Mahatma Phule), सावित्रीआई फुले (Savitribai Phule), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा अपमान केला, त्यांनी माफी मागितली का? जर भाजपात धमक असेल तर महाराष्ट्रात राहुल गांधींच्या (Rahul Gandhi Maharashtra Tour) केसालासुद्धा हात लावून दाखवा असे खुले आवाहन नाना पटोलेंनी चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले.

भाजपसोबत जाणे हा राष्ट्रवादीचा (NCP) विषय आहे. परंतु काँग्रेसचे नेत आणि कार्यकर्ते भाजपसोबत जात
असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल असू सूचक इशारा नाना पटोले यांनी दिला.
भंडारा-गोंदिया बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या युतीवरुन अजित पवार
(Ajit Pawar) आणि नाना पटोले यांच्यात खडाजंगी झाली होती. परंतु अमरावतीमधील वरुड बाजार समितीत
भाजप-काँग्रेसची युती झाली आहे. यावर बोलताना नाना पटोलेंनी कारवाईचा इशारा दिला आहे.

Web Title :-  Rahul Gandhi Maharashtra Tour | rahul gandhi in maharashtra nana patole reply to chandrashekhar bawankule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | मविआ सरकारमध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद का दिले? जयंत पाटलांचा खुलासा म्हणाले-‘राजकारणात काही गोष्टी…’

Ambedkar Jayanti 2023 | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 25 हजार पुस्तके वाटप (Video)

Maharashtra Political News | ‘बावनकुळेंना त्यांच्या पक्षात किंमत नाही, ते काय राहुल गांधींना रोखणार?’