कामगारांना भेटायला गेले राहुल गांधी, लोक सोशल मीडियावर सांगतायेत त्यांच्या बुटाची किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शनिवारी १६ मे रोजी राहुल गांधी रस्त्यावर उतरले होते. दिल्लीच्या आश्रमातील सुखदेव विहार उड्डाणपुलाजवळ कामगारांची परिस्थिती जाणण्यासाठी बाहेर पडले होते.

नंतर अर्थमंत्री म्हणाल्या की, राहुल यांनी मजुरांचा वेळ वाया घालवला. कॉंग्रेसने सांगितले की, कार्यकर्त्यांनी कामगारांना कारने घरी पाठवले. मग सोशल मीडियामध्ये लोकांचे लक्ष राहुल गांधींच्या शूजकडे गेले. शूजचा ब्रँड आणि किंमत उघडकीस आणली.

राहुल गांधींनी जवळपास १४ हजार किंमतीचे शूज घातले होते आणि गरिबांशी बोलण्यासाठी पोहोचल्याचे सांगण्यात आले.

नोटबंदीच्या वेळी राहुल गांधी ४००० रुपये काढण्यासाठी रांगेत उभे होते, याचीही आठवण करून दिली.

कामगारांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी बाहेर पडले असताना राहुल गांधींवर टीका सुरु झाली. साडे तेरा हजारांचे शूज घालून ते बाहेर गेले याबद्दल भाजप समर्थक त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. नेत्यांच्या कपड्यांच्या, चष्मा, घड्याळांच्या किंमतींचा सोशल मीडियावर उल्लेख करण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी पंतप्रधान मोदींनी २६ डिसेंबर २०१९ रोजी वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण पाहिले. सूर्यग्रहण पाहण्यासाठी त्यांनी एक चष्मा वापरला होता. असे सांगितले गेले होते की, तो चष्मा जर्मन कंपनी Maybach चा आहे, एक लाख 60 हजारांचा.

काही लोकांनी म्हटले की चष्मा रेट्रो बफेलो हॉर्न ब्रँडचा आहे. किंमत ३ हजार ते ५ हजार मध्ये आहे. या वेळीही तेच घडत आहे. लोकांनी १३ हजारचे शूज फार महाग नसल्याचे सांगत राहुल गांधींचा बचावही सुरू केला आहे. यावरून वाद करण्याची गरज नाही. ट्विटरवर शूजवरून बराच मोठा वाद सुरू आहे. किंमती निश्चित केल्या जात आहेत.

या सगळ्यात तीव्र उन्हात लाखो कामगार तुटलेली चप्पल घालून कितीतरी मैल चालत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आणि हे चित्र ट्विटरवरील कोणताही वाद बदलू शकत नाही. इतर वेबसाईटवर हा तेरा हजारचा शूज अर्ध्या किंमतीत विकला जात आहे, ही पण एक वस्तुस्थिती आहे. जर ही वस्तुस्थिती तुमच्या राजकारणाला अनुकूल असेल तर तेही ट्विटरवर वापरू शकता. आणि हेही लक्षात ठेवा जेव्हा आपल्याला महामारी आणि स्थलांतराबद्दल बोलायचे होते, तेव्हा आपण नेत्याच्या शूजच्या किंमतीची चर्चा करत होतो.