राहुल गांधींना माफी मागावीच लागेल ! राज्यातील सरकार हे स्थगिती सरकार, फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला उद्या पासून सुरुवात होणार आहे मात्र या अधिवेषणाबाबत सरकार गांभीर्याने विचार करत नसल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच सरकार सत्तेवर येऊन अनेक दिवस उलटून गेले आहेत तरीही सरकारने अजून मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही अशा शब्दात फडणवीस यांनी सरकारवर हल्ला बोल केला आहे.

सरकार सुरु होणाऱ्या अधिवेशनाबाबत गांभीर्याने विचार करत नाही हे सरकार स्थगिती सरकार आहे. सत्तेवर आल्यापासून सरकारने केवळ कामांना स्थगिती देण्याचे काम केलेले आहे. तसेच या सरकारने सत्तेवर येण्याआधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे सांगितले होते. अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना देखील अद्याप मदत मिळालेली नाही सरकारने सत्तेवर आल्यावर कोणताही चांगला निर्णय घेतलेला नाही. अशा शब्दात फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरले आहे.

सरकारमधील जेष्ठ नेते वाटलेली मंत्रीपदे ही तात्पुरती स्वरूपातील आहेत असे सांगत आहेत. वाटप झालेल्या मंत्रिपदांबाबत देखील स्तिरता या सरकारमध्ये नाही त्यामुळे समस्यांबाबत कोणाला उत्तर मागायचे असा प्रश्न पडला असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले.

राहुल गांधींच्या विधानाचे देश निषेद करतो
सावरकर म्हणजे काय हे राहुल गांधींना ठाऊक नाही. स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करणारे हे सावरकर आहेत तर हजारो व्यक्तींना क्रांतीची प्रेरणा देणारे हे वीर सावरकर आहेत. मात्र याबाबतची माहिती राहुल गांधींना नाही. केवळ गांधी आडनाव लावल्याने कोणी गांधी होत नाही त्यामुळे राहुल गांधींनी केलेले वक्तव्य निषेधार्थ आहे म्हणून राहुल गांधींनी माफी मागितलीच पाहिजे असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/